मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (11:12 IST)

नवरात्र अष्टमी पूजा हवन विधी

नवरात्रात अष्टमी पूजा करताना होमहवन करण्याची प्रथा आहे. जाणून घ्या पूजा विधी- 
पूर्व दिशेला चौकोनी विटा रचून यज्ञवेदी तयार करावी. यज्ञकुंड असे या वेदीला म्हणतात. यज्ञकुंडात चांगली शुध्द माती व सुगंधी द्रव्ये टाकावे. या वेदीसमोर एक पाट मांडून त्यावर तांदळाचे तीन पुंजके ठेवावे. उजव्या बाजूच्या दोन पुंजक्यावर दोन तांब्याचे कलश पाणी भरुन त्यावर दोन ताम्हणे ठेऊन त्यांत तांदुळ भरुन एक- एक सुपारी ठेवावी. कलशपूजा ही वरुणदेवाची पूजा असते. डाव्या बाजूच्या तांदळाच्या पुंजक्यावर गणपतीचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी. कलशासमोर पाच फळे, पाच पानांचे विडे, पाच खारका, बदाम, खोबरे व नारळ ठेवावे. पाटाच्या डाव्या बाजूला मातृका म्हणून १७ सुपार्‍यांची स्थापना करतात. यज्ञ करण्यासाठी ब्राम्हण गुरुजींना बोलावावे. हवन विधी करण्यासाठी यजमान व त्यांची पत्नी नवीन वस्त्रे धारण करुन दोघांनी पाटांवर बसावे. नंतर गुरुजी मंत्रोच्चारण करुन हवन विधीला प्रारंभ करतात. देवीची प्रार्थना करुन संकल्प करतात.
 
संकल्प -
मम ( यरमानस्य ) सहकुटुंबस्य कायिक, वाचिक , मानसिक, ज्ञाताज्ञात सकलदोष परिहारार्थ
सकलकामनासिध्दयर्थमायुरारोग्यभिवृध्दयर्थ हवन कर्मा गत्वेन आदौ निर्विघ्नता सिध्दयर्थ
आधि व्याधि,जरा पीडा मृत्यु परिहार द्वारा समस्त अरिष्ट,ग्रहपीडा दोष निवारणार्थ स्थिर
लक्ष्मी , किर्ति , लाभ, शत्रु पराजय, रुद्राभीष्ट सिध्दयर्थ गणपति पूजनं करिष्ये ।
ॐ एकदंताय विद्‍मयहे वक्रतुंडाय धीमही । तन्नो दंती प्रचोदयात्॥
 
गणपतिपूजन करत म्हणावे--
हे हेरंब त्वमे ह्येंहि अंबिकात्र्यंबकात्मज । सिध्दिरिध्दियुतत्र्यक्ष सर्वलोकपित: प्रभो ॥
आवाह्यामि पूजार्थ रक्षार्थ च मम क्रतो:। इहागच्छ गृहाण त्वं पूजां रक्ष च मे क्रतु: ॥
विश्वेश्वराय वरदाय सुराधिपाय । लंबोदराय सकलाय जगध्दिताय । नागाननाय सितसर्पविभूषाय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते ।
सर्वेश्वराय शुभदाय सुरेश्वराय । भक्तप्रसन्न वरवाय नमो नमस्ते ॥ वक्रतुंड महाकाय सुर्यकोटीसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
यानंतर पुण्याहवाचन करतात. या वेळी वरुणाची पूजा करतात. आणि मग सुवासिनींकडून यजमान व त्याच्या पत्नीला औक्षण करतात.
 
मातृका पूजन -
यज्ञाचे संरक्षण व्हावे यासाठी मातृका देवतांचे पूजन करतात.
गौरी पद्‍मा शची मेधा सावित्री विजयाजया । देवसेना स्वधा स्वाहा मातरो लोकमातर: ।
धृति: पुष्टि: तथा तुष्टि आत्मन: कुलदेवता । ब्रह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा ।
वाराही च तथेंद्राणी चामुंडासप्त मातर: ।
 
नंतर गुरूजींनी यज्ञाला प्रारंभ करण्यापूर्वी लौकिक आचार म्हणून घरातील मंडळी व नातेवाईक यजमान व त्याच्या पत्नीला वस्त्र प्रदान करुन आशीर्वाद देतात.
 
स्थानशुध्दी -
तयार केलेल्या यज्ञकुंडाच्या जागेची गुरुजी गोमुत्र , पंचगव्य , पांढरी मोहरी टाकून शुध्दता करतात.
ॐ अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपिऽवा । य: स्मरेत पुंडरिकाक्षम्‍ सबाह्याभ्यन्तर: शुचि: ॥
 
देवतापूजन -
ब्रह्मादिमंडळ देवतांचे पूजन मंत्राद्वारे केले जाते.
विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान् । सरस्वती प्रण्षौम्यादौ सर्वकार्यार्थ सिध्दये ॥
 
पाण्याने भरलेल्या कलशावरील ताम्हनात तांदूळ पसरुन मध्यभागी देवीची मूर्ती स्थापन करतात. श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा या देवतांचे पूजन करतात.
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा , क्षमा ' शिवा, धात्री, स्वहा, स्वधा नमोऽस्तुते ॥१॥
जय त्वं देवि चामुण्डे जय भूतार्तिहारिणी । जय सर्वगते देवि कालरात्रि नमोऽस्तुते ॥२॥
 
नंतर देवीचा ध्यानमंत्र म्हणावा.
ध्यानमंत्र-
ॐ अम्बे अम्बिके अम्बालिके न मानयति कश्चन । ससस्त्यश्वक सुभद्रिकां कांपीलवासिनीम ॥
श्रीदुर्गादैव्यै नम: ।
नंतर पीठदेवतांचे पूजन करतात.
 
अग्निस्थापना-
हवनासाठी अग्नीची स्थापना करण्याकरिता विशिष्ट लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रज्वलित केली जाते. याला अग्निमंथन म्हणतात. अग्निमंथनाचे लाकूड, तुप, लोणी, चंदनाची व आंब्याच्या झाडाची काष्ठे होमकुंडात टाकावी. हवन पूर्ण होईपर्यंत अग्नी प्रज्वलित ठेवावा.
 
ॐ चन्द्र्मा मनसो जात: तत्तक्षौ: सूर्यऽअजायत । श्रोताद्वायुर प्राणश्च मुखदग्निर्जायत् ॥
हा मंत्र अग्नी प्रज्वलित करताना म्हणावा
 
अग्नीची पूजा करतात.
अग्निचा ध्यानमंत्र -
ॐ चत्वारि श्रृंगात्या यस्य पादा द्बे शीर्षे सप्त हस्तासोअस्य । त्रिधा बध्दो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याऽअविवेश ।
ॐ मुखां य: सर्वदेवानां दव्यभुक् कण्यभुकं तथा । पितृणां च नमस्त्स्मै विष्णवे पावकात्मने ॥ पावकाग्नये नम: ।
या मंत्राने अग्नीची पंचोपचार पूजा करतात.
 
नवग्रहपूजन -
नवग्रहांच्या शांतीसाठी गंधपुष्प वाहून पूजा करतात. नंतर यज्ञकुंडामध्ये तूप, समिधा, तीळ, भात टाकून नवग्रहासाठी हवन करतात. या वेळी गुरुजी प्रत्येक ग्रहाचा मंत्रोच्चार करतात.
 
सप्तशती हवन
संकल्प -
श्रीमहाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती-नवदुर्गा देवता प्रसन्नतार्थ च त्रितापात् सर्वबाधा प्रशमनार्थ, सर्व दोष निवारणार्थ
सर्वविध मनोरथ कामना-सिध्दयर्थ ब्राह्मण द्वारा श्रीदुर्गादेवी प्रीतये दुर्गा सप्तशती मन्त्रैर्यथाविधि हवनं च करिष्ये ॥
देवी माहात्म्य दुर्गा सप्तशती ग्रंथाचे गंधपुष्प वाहून पूजन करावे.
ॐ नमो दैव्यै महादैव्यै शिवाय सततं नमः । नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥
 
यानंतर गणपतीला
ॐ गं गणपतये स्वाहा ।
या मंत्राने १०८ आहुती देतात व शक्तिरुप देवीला
ॐ अंबिकायै स्वाहा ।
या मंत्राने १०८ आहुती देतात. आणि मग सप्तशतीच्या प्रत्येक श्लोकात बरोबर हवनामध्ये भात, सातू, तीळ, समिधा, उसाचे तुकडे, सुगंधी पुष्पे व विडयाच्या पानाने ७०० वेळा 'स्वाहा' म्हणून आहुती देतात.
 
ॐ अम्बेऽअम्बिकेऽम्बालिके नमान्नयति कश्चन । ससस्त्यश्वक सुभद्रिकाकाम्पीलसिनीम् स्वाहा । श्री दुर्गादैव्यै परमाहुति समर्पयामि ॥

बलिदान
संकल्प - देशकालौस्मृत्वा कृतस्य दुर्गा सप्तशती हवनाख्येनकर्मणि सांगता सिध्दयर्थं बलिदानं करिष्ये ।
असे म्हणून देवीसमोर कोहळा कापतात. हेच बलिदान.
 
पूर्णाहुती -
नारळ व सौभाग्यवायन अग्नीला अर्पण करुन गुरुजी पूर्णाहुतीचे मंत्र म्हणतात.
ॐ मूर्धानं दिवो आरतिं पृथिव्या वैश्वानरमृत आ जांतमग्निम् । कविः सम्राज मतिथीं जनानामासन्ना पात्रं जनयन्त देवाः स्वाहा ॥
 
उत्तरपूजा -
आहुती देणे पूर्ण झाल्यावर देवीला गंध, पुष्प, हळद्कुंकू वाहून धूप, दीप ओवाळून नैवेद्य दाखवतात.
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ॥
असे म्हणून प्रदक्षिणा घालतात. नंतर एका कुमारिकेची व सुवासिनीची पूजा करुन खणानारळाने ओटी भरतात.
 
प्रार्थना -
कलशातील पाणी यजमान व त्याची पत्नी आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांवर शिंपडून या सर्वांना हवनाचे पुण्य प्राप्त होवो अशी देवीला प्रार्थना करतात आणि होमकुंडातील भस्म सर्वांच्या कपाळी लावतात.
 
गोप्रदान -
सर्व कर्माचे फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना चांदीची गायीची प्रतिमा व वस्त्रे प्रदान करतात.
 
देवता विसर्जन -
कलशावर अक्षता वाहून गुरुजी यजमानाकडून कलश हलवतात.
यान्तुदेवगणास्सर्वे पूजामादाय पार्थिवात् इष्टकामप्रसिध्दयर्थ पुनरागमनाय च ॥
 
आशीर्वाद -
यजमान गुरुजींना दक्षिणा देतात आणि गुरुजी सर्वांचे कल्याण व्हावे, सुखशांती लाभावी, ऐश्वर्यवैभव प्राप्त व्हावे यासाठी आशीर्वाद देतात.
श्रीवर्चस्व मायुष्यमारोग्य भाविधात शोभमामं महीयते । धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सर दीर्घमायुः ॥
 
तर्पण व मार्जन -
एका मोठया पात्रात दूध, पाणी, पुष्प वा दूर्वा घालून तर्पण-मार्जनाचे मंत्र म्हणून ताम्हनात सोडतात.
ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुंडायै विच्चे । श्रीदुर्गादेवी तर्पयामि । ॐ ऐं र्‍हीं क्लीं चामुंडायै विच्चे । श्री दुर्गादेवी मार्जयामि॥
महादेव्यै च विद्‌महे दुर्गायै धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥ महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः ।
रक्तबीजवधे देवि चण्डमुण्डविनाशिनी नमः । शुम्भनिशुम्भ धूम्राक्षस्य मर्दिनी नमः ।
सर्वशत्रुविनाशिनी सर्वसौभाग्यदायिनी नमः । देहि सौभाग्यमारोग्य देहि मे परमं सुखम्‌ । रुपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥
उदयोऽस्तु । जय जगदंब ॥