गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020 (10:30 IST)

नवरात्री मंत्र : राशीनुसार जप करा

प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी, प्रसिद्धी, संपत्ती, आर्थिक मानसिक आणि शारीरिक सुखाची अपेक्षा असते. नवरात्रात या सर्व सुखांच्या प्राप्तीसाठी आपल्या राशीनुसार हे उपाय करा.
 
मेष - मेष राशीच्या जातकांनी नवरात्रात शक्तीसह महादेवाची आराधना करावी. दररोज 11 माळ कराव्या.
मंत्र : ॐ नम: शिवाय किंवा ॐ शिवाय नम:
 
वृषभ - वृषभ राशीच्या लोकांनी देवीची या मंत्राने आराधना करावी.
मंत्र : ॐ मातंगी नम: किंवा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते.
 
मिथुन - मिथुन राशीच्या जातकांनी नवरात्रात या मंत्राचा जाप करावा.
मंत्र : ॐ शिव शक्त्यै नम: 
 
कर्क - कर्क राशीच्या लोकांनी देवी आईची या मंत्राने आराधना करावी.
मंत्र : ॐ आनंदांनायकायै नम:
 
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी या मंत्राचा जाप करावा. 
मंत्र : ॐ दीप लक्ष्म्यै नम: 
 
कन्या - कन्या राशीच्या लोकांनी देवी आईची आराधना करताना या मंत्राचा जप करावा.
मंत्र : ॐ सर्वमंत्रमयी नम:
 
तूळ - तूळ राशीच्या लोकांनी देवी आईला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जाप करावा. 
मंत्र : ॐ अंबे नम:
 
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या जातकांनी नवरात्राच्या नऊ दिवसात या मंत्राचा जाप करावा.
मंत्र : ॐ ब्रह्मांड नायिकायै नम:
 
धनू - धनु राशीच्या लोकांनी या मंत्राचा जाप करावा.
मंत्र : ॐ विद्या लक्ष्म्यै नम: 
 
मकर- मकर राशीच्या जातकांनी देवी आईची या मंत्राने आराधना करावी.
मंत्र : ॐ आद्य नायकायै नम: 
 
कुंभ - कुंभ राशीच्या जातकांनी नवरात्रात या मंत्राचा जाप करावा.
मंत्र : ॐ शांभवी नम:
 
मीन - मीन राशीच्या लोकांनी या नऊ दिवसात या मंत्राचा जाप करून आपले कल्याण करावे.
मंत्र : ॐ कात्यायनी नम: