Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आर्यादुर्गा देवी - अध्याय १

Updated: बुधवार, 25 मे 2022 (13:29 IST)
 
पुण्य श्लोका महाराजा । शत्रु मर्दना शतानिका । व्यापिले असे तिन्ही लोका । पुरुष सहायें प्रकृतीही ॥१०॥
 
विष्णू मायारुपी तेजस्विता । कैसी प्रगट झाली देवता । ही ऐशी कथा श्रवणितां । कल्याण होईल श्रवणिकांचें ॥११॥
 
एकेकाळीं प्रग्जोतिष नगरी । सिंधूद्वीप ऋषी संभवी । वेत्रावती स्त्री उदरीं । पुत्र झाला महा प्रतापी ॥१२॥
 
पुत्र शूर पराक्रमी । तया सामर्थे गदगदे भूमी । गाजला वृत्रासूर नामीं । प्राग्यजोतिष नगरांत ॥१३॥
 
तया बलवान शत्रुमर्दने स्थापियली । प्राग्यजोषि स्थळीं राजधानी । संपूर्ण भूंमंडळ जिंकोनी । चालता झाला स्वर्ग मार्गी ॥१४॥
 
जाउनी मेरु पर्वतावरी । तेथुनी जाता झाला स्वर्गावरी । करुनी चाल इंद्रावरी । जिंकियले तयासी ॥१५॥
 
करुनी युद्ध अग्री सवें । यम निरुती वरुणासवें । वायु कुबेरें रुद्रासवें । जिंकियलें सर्वांसी ॥१६॥
 
वृत्रासुरें स्वर्गं नगरी जिंकियली । सत्ता आपुली स्थापियली । करिता झाला महा बळी । कामें देवादि महर्षीचीं ॥१७॥
 
वृत्रासुर भयें देव - ऋषींनीं । जागा आपुली सोडुनी । गमन केलें सर्व मंडळीनी । ब्रह्मदेवाकडे सत्य लोकीं ॥१८॥
 
लीन होउनी ब्रह्मदेवाचे चरणीं । सांगते झाले आपुलीं गार्‍हाणी । वृत्रासुरें आम्हां सर्वां गांजुनीं । त्रास दिधला अतिशय ॥१९॥
 
आम्हां सर्वांचा तूं नाथ असतां । आम्हीं झालों अनाथ आतां । देऊनी आश्रय आम्हां समस्तां । रक्षी रक्षी देवाधिदेवा ॥२०॥
 
आम्ही आपुली जागा सोडुनी । असुरभयें काननी हिंडूनी । येते झाले जीव रक्षणी । ब्रह्मदेवा तुजलागीं ॥२१॥
 
ऐकूनि गार्‍हाणी तयांचीं । ब्रह्मदेवें पूजा केली नारायणाची । शंख , चक्र , गदा , पद्म हाती । ह्रदयीं शोभे श्री वत्स लांच्छन ॥२२॥
 
प्रार्थना करुनी श्रीविष्णूची । सांगितली करणी वृत्रासुराची । गांजिलें असे सर्व देवासी । रक्षी रक्षी तयांसी ॥२३॥
 
देवाधिदेव कमलनयन । वृत्रासुराची करणी ऐकून । अति रागें संतप्त होऊन । विचार करी वृत्रासुर मर्दनासी ॥२४॥
 
नेत्र गरागरा फिरवून । क्रोधें मुख भयंकर होऊन । त्यांतून प्रगटलें दिव्य तेज एक । बाहेर पडलें मुखांतून ॥२५॥
 
त्या नंतरें ब्रह्मादिदेव कपाळांतुनी । तैसेंचि तेज बाहेर येवोनी । सर्व तेजें एकवटोनी । तया प्रकाशें जग व्यापिलें ॥२६॥
 
ऐशा परी तेज एकवटलें । तयानें रुप आकारिलें । कन्यारुप हळु हळु दिसलें । आनंदित झाले सर्व देव ॥२७॥
 
शंभुतेजें मुख बनलें । यमातेजें केश विस्तारिले । विष्णू तेजें द्वौभुजा जाहले । स्तन जाहले चंद्र तेजें ॥२८॥
 
इन्द्र तेजें बनले पोट । वरुण तेजें जंघा आणि पौट । पृथ्वी तेजें कंबरट । पदें बनलीं ब्रह्म तेजें ॥२९॥
 
रवी तेजें पादांगुलें बनलीं । वसुतेजें हस्तांगुलें जाहलीं । कुबेर तेजें नासिका शोभलें । दंत पंक्ती बनल्या प्रजापती तेजें ॥३०॥
 
अग्नि तेजें नयने प्रकाशलीं द्वा सन्ध्यातेजें भुवया आकारिलीं । वायू तेजें कर्ण जहाले । सर्व देव ऋषी तेजें जाहली देवता ॥३१॥
 
तया देवीसी पाहून । भीतिग्रस्त देवादि समस्त जाण । हर्षले आनंदित होऊन । त्रैलोक्य आनंदित जहालें ॥३२॥
 
तया देवीस पाहतां होऊन प्रफुल्ल । रुद्र देवें दिला त्रिशूल । दिधलें विष्णूने चक्र उज्ज्वल । दिला ब्रह्मदेवे ब्रह्मदण्ड ॥३३॥
 
यमें दिधला दण्ड आकर्ष । वरुणें दिला आपुला पाश । वायूने दिलें धनुष्य । वज्र दिधलें इन्द्राने ॥३४॥
 
दिलें खडगास्त्र कालानें शंख दिधला वरुणाने । हार आणि चूडामणी क्षीरसागराने । हिमालयें दिलें सिंहासन ॥३५॥
 
महाबली ऐरावतें घंटावाद्य दिलें । विश्वेदेवें मुकुट माळ केयूर दिले । सर्व देवें अमोल अलंकार दिले । दिलीं विपुल आयुधें ॥३६॥
 
अलंकारें मस्तकापासुनी पदकमलावरी आकाशमण्डळी अती शोभली । तियेनें गगन भेदी गर्जना केली । तेणें सर्व आकाश दुमदुमलें ॥३७॥
 
हलली पृथ्वी पर्वतादिक । तयागर्जने भ्याले भूतळी लोक । जय जयकार करुनी देवादिक । स्तुती करुं लागले तियेची ॥३८॥
 
आम्हां सर्वांची जननी तूं । स्वभावें आम्हां सर्वां व्यापिसी तूं । स्वाहा आणि स्वधाही अससी तूं । एकार क्रिया शक्ति अससी तूं ॥३९॥
 
असे भव्य कराल तूंची । श्री लक्ष्मी आणि पुष्टि असे तूंच । सरस्वती लज्जा कीर्ती ही तूंची । आम्हा सर्वांचा आनन्द असे तूंची ॥४०॥
 
प्रभा आणि श्रुति अससी तूं । दम इन्द्रिय निग्रह तूं । बुद्धी सिद्धी अससी तूं । तूंची असे अहंकाररुपी ॥४१॥
 
र्‍हीं बीज नि मधु नाशकर्ती तूं । ब्रह्मा विष्णु महेशी वास करणारी तूं । सर्वां व्यापक देवता तूं । वेद गर्भ दिती तूची असे ॥४२॥
 
येऊनी अशा सर्वांचे अंगातुनी । शक्ति संभवे रुप धरुनी । तुजशी जिंकू न शके कोणी म्हणोनि तुझें नाम असे दुर्गादेवी ॥४३॥
 
इति श्री गोकर्ण पुराणे उत्तर खण्डे श्री आर्यादुर्गा महात्म्य
 
दुर्गा प्रादुर्भवो नाम प्रथमोध्यायः
ALSO READ: आर्यादुर्गा देवी - अध्याय २
ALSO READ: आर्यादुर्गा देवी - श्रीआर्यादुर्गाष्टक

सर्व पहा

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

श्रावण स्पेशल: कांदा-लसूण न वापरता बनवा ५ झटपट पदार्थ

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments