रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जानेवारी 2021 (17:32 IST)

श्री तुळजाभवानी माहात्म्य - अध्याय २९

श्रीगणेशाय नमः ॥ शाकंभरीत्वरिताभवानी ॥ दुर्गदुर्गासुरमर्दिनी ॥ शक्तिक्षीसकलवेदोद्धारिणी ॥ तुलजादेवीतुजनमो ॥१॥
अदत्तदाषाचाकुमर ॥ उन्मत्तझालदरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेलाथोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥२॥
क्रोधादिसेनाघेऊनबहुत ॥ सत्पात्रझालादरिद्रासुर ॥ तेणेंनाशकेला थोर ॥ स्वधर्मकुलाचारबुडविला ॥३॥
धांवपावनिगमजननी ॥ तुझेंनाम आसुरमर्दिनी ॥ तरीअसुरांचानाशकरुनी ॥ देवसेनासांभाळी ॥४॥
आतांऐकाश्रोतेसमस्त ॥ पूर्वकथाक्रमनिश्रित ॥ स्कंदऋषीसीकथासांगत ॥ इंद्रवचनदेतऐकोनी ॥५॥
सत्वरनिघालाइंद्रापासोन ॥ धारासुराच्यासंन्निधयेऊन ॥ अनुक्रमेइंद्रवचन ॥ निवेदनकेलेंसर्वही ॥६॥
ऐकोनीदानसर्वक्षोभले ॥ आरक्तनेत्रेंओठचावेले ॥ सिद्धसेनाकरुनीचालिले ॥ अमरावतीजिंकावया ॥७॥
संग्रामउत्सवधरुनीचित्तीं ॥ ऐकापुढेंएकधांवती ॥ सिंहनादकोनीगर्जती ॥ वेढाघालितीइंद्रापुरा ॥८॥
नगरांतप्रवेशकरुंपाहती ॥ इतक्यांतदेवराजशचीपती ॥ देवसेनेसहितयुद्धाप्रती ॥ निघताझालाअतिवेगें ॥९॥
सज्जकेलोआदिव्यरथ ॥ सहस्त्राशअजुंपिलेंज्याप्रत ॥ सुमुखदृढपाष्णीयुक्त ॥ दॄढ अक्षचक्रेंशोभती ॥१०॥
मेघाऐसागंभीरनादित ॥ क्षुद्रघटाजाळमाळामंडित ॥ देवाहर्षदतिरस्करीत ॥ दानवापताकाफडत्कारें ॥११॥
शस्त्रअस्त्रजालभरलेंरथांत ॥ त्याचेकिरणेंप्रकाशवंत ॥ सूर्यमंडलासारखादिसत ॥ ध्वजाग्रींचिन्हगजाचें ॥१२॥
रथचालतांगजऐरावत ॥ ध्वजाग्रचालताऐसेंदिसत ॥ ऐसारथशोभिवंत ॥ सज्जकरुनितेधवां ॥१३॥
इंद्रपरमप्रीतीयुक्त ॥ सारथ्याचाधरुनिहस्त ॥ आरुढझालादिव्यरथांत ॥ स्तवितीदेवागणतेकाळीं ॥१४॥
रथींबैसलासहस्त्रनयन ॥ मस्तकीछत्रविराजमान ॥ शतशलाकायुक्तरत्‍नजडितदंडशोभती ॥१५॥
चवर्‍याढळतीदोहोबाजुसी ॥ मस्तकींमुगुटतेजोराशी ॥ कंकणशोभतीकरासी ॥ बाहुवटेवाहुसीशोभती ॥१६॥
रत्‍नमौक्तिकहारगळ्यातं ॥ मंदारमालाचंदनेंपुजीत ॥ दक्षिणहस्तींवज्रशोभत ॥ दैत्यासी तर्जनकरणारे ॥१७॥
दुंदुर्भाचेनादहोत ॥ तेणेंदशादिशार्जत ॥ नानावाद्यांचागजरहोत ॥ दैवसन्यसमस्तएकवटलें ॥१८॥
देवराहसैन्यासहित ॥ युद्धकरावयाचालिलात्वरित ॥ अग्निमेषारुढशाक्तिहातांत ॥ मुखद्वयज्याचेशोभती ॥१९॥
सत्पजिव्हसप्तहस्त ॥ चतुःशृंगत्रिपादयुक्त ॥ प्रलयांतकस्वसैन्यसहित ॥ इंद्रासीअनुलक्ष्मीनिनिघाली ॥२०॥
दंड्पाणीमहिषारुढहोऊन ॥ रिगसेबासवेंघेऊन ॥ सर्वसाक्षीयमनिघालाजाण ॥ युद्धासइंद्राबरोबर ॥२१॥
राक्षसाधीपनैऋती ॥ खड्‌गचर्मघेउनीहातींज ॥ कुणुपारुढराक्षससेनासांगती ॥ घेऊननिघालाइंद्रासवे ॥२२॥
वरुणमकररुढ पाशहस्त ॥ स्वसेनाघेऊनीनिघालात्वरित ॥ वायुहरिणारुढांकुशहातांत ॥ सेनेसहितनिघाला ॥२३॥
यक्षाधिपगदापाणी ॥ पुष्पकविमानींआरोढोनी ॥ यक्षसेनासवेघेउनी ॥ कुबेरनिघालायुद्धासी ॥२४॥
वृषारुढशुलहस्त ॥ पिनाकपाणीप्रथमगाणासहित ॥ आदित्यवसुद्रासाध्यामरुत ॥ पितृगणाअश्विननिघाले ॥२५॥
विश्वेदेवाविद्याधरमहोरग ॥ सन्नद्धहोऊनीसमरग ॥ नानाप्रहरणायुधसवेग ॥ इंद्रासहितनिघाले ॥२६॥
महाबलदेवसेनासहित ॥ पुरंदरनिघालायुद्धाप्रत ॥ जेथेंदैत्यसेनास्थित ॥ नगरासीवेष्ठोनीउभीहोती ॥२७॥
प्रवृत्तझालेंमहायुद्ध ॥ उभयसेनानीक्रौर्यसनिद्ध ॥ बाणसमुहसोडितीविविध ॥ परस्परांसीजिंकावया ॥२८॥
तोमरभींदिमालाशक्ति ॥ घेऊनीएकमेकाहाणती ॥ मुसळभालेगदामारिती ॥ खंड्गेवधितीएकमेंकां ॥२९॥
चक्रेंसोडोनीदेहछिदिती ॥ सवेंचपाषाणवृष्टिकरिती ॥ पाशांकुशघेउनी मारिती ॥ परस्परेंवीरतेव्हां ॥३०॥
हानाहाणमारामारा ॥ बांधाबांधाधराधरा ॥ छेदुनिटाकाविदारणकरा ॥ उभयसेनेंतशब्दकरिती ॥३१॥
अश्वारुढअश्वारुढासी ॥ गजारुढजगजारुदासी ॥ धांउनमारितीएकमेकांसी ॥ देवाआनिदानव ॥३२॥
रथीधांवतीरथावरी ॥ परस्परेंकरितीझुंजारी ॥ पायींचेवीरपायदळावरी ॥ खंगचर्मघेऊनीधांवती ॥३३॥
एकमेकासीमारिती ॥ द्वंद्वयुद्धकरुंलागती ॥ संग्रामपाहूनभ्याडाप्रती ॥ थरारोमअंगासीयेतकाटा ॥३४॥
यममीहषारुढबळें ॥ दैत्यसैन्यावरीचवताळे ॥ दंडप्रहारेंफोडीकपाळें ॥ महावीरांचेंतेंधवां ॥३५॥
गजांचेंफॊडीतमस्तक ॥ अंसंख्यातमारिलेंरणींकटवः ॥ अश्वांचेसमुदायअनेक ॥ दंडघायेंद्विधाकरी ॥३६॥
सोडोनियांतीक्ष्णशर ॥ वीरमारिलेअपार ॥ समुळतोडोनियांकर ॥ नासिकाकर्णछेदिलें ॥३७॥
छेदुनीटाकीनेत्रहनुवटी ॥ द्विधाकेलेंतोडोनीकटी ॥ गजांच्याशुंडाताडीतनेटी ॥ रविनंदनक्रोधानें ॥३८॥
यमाचेसैनिकऊष्णज्वर ॥ तैसाचधांवोनीशीतज्वर ॥ पीडाकरितेझालेफार ॥ दैत्यसेनेसअतिवेगें ॥३९॥
धनुर्वातसंधिवात ॥ कासश्वासेंपीडिलें बहुत ॥ अनेकरोगौठावलेरणांत ॥ दानवपाडिलेधरणीवरी ॥४०॥
रोगेंव्याकुळदैत्यसैन्य ॥ शस्त्रधायेंपावलेंमरण ॥ रक्तनदीपुरयेऊन ॥ वाहुंलागलीभडभडा ॥४१॥
दैत्यसेनेचेंखुंटलेंबळ ॥ यमभयानेंपळतीसकळ ॥ कितीएकहोऊनव्याकुळ ॥ दडूनराहिलेंतेंथेंची ॥४२॥
धारासुराचासेनापती ॥ विरुपाक्षनामाबैसोनीरथीं ॥ धावंतपातलारणक्षितीं ॥ यमाचेनिधतेधवां ॥४३॥
आपलेंसैन्यापळालें ॥ शत्रुचबेंळाधिकझालें ॥ ऐसेंत्यानेंजेव्हांपाहिलें ॥ तेव्हांकोपालाअत्यंत ॥४४॥
यमासीनिकुरेंयुद्धकरावें ॥ ऐसीइच्छाधरुनिजींवें ॥ रथाभिडविलानिकटजवें ॥ यमाचेंपुढेंतेवेळीं ॥४५॥
त्वरनेदेंशबाणभात्यांतुन ॥ काढुनधनुष्यासीचढवून ॥ त्याबाणेंयमासीबिंधुन ॥ वचनबोलततेवेळीं ॥४६॥
विरुपाक्षबोलेलवचन ॥ संग्रामकरीलदारुण ॥ पुढिलेंअध्यायीतेंकथन ॥ पांडुरंगजनार्दनम्हणतसे ॥४७॥
इतिश्रीस्कंदपुराणेसंह्याद्रीखंडेतुरजामहात्म्येशंकरवरिष्ठसंवादे ॥ एकोनत्रिंशोध्यायः ॥२९॥
श्रीजगदंबार्पणस्तु ॥ शुभभवतुं ॥