10 की 11 ऑक्टोबर, कन्या पूजन कधी करावे ?
Sharadiya Navratri Kanya Puja 2024: शारदीय नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमीला कन्या भोज आयोजित केले जाते. कन्या पूजनला कुमारिका पूजा देखील म्हणतात. कन्या पूजा केल्याने दुर्गा देवीचा भरपूर आशीर्वाद मिळतो.
अष्टमी तिथी प्रारंभ: 10 ऑक्टोबर 2024 दुपारी 12:31 वाजेपासून
अष्टमी तिथी समाप्ती: 11 ऑक्टोबर 2024 दुपारी 12:06 वाजेपर्यंत
शारदीय नवरात्रि नवमी 2024 तिथी:-
नवमी तिथी प्रारम्भ- 11 ऑक्टोबर 2024 दुपारी 12:06 वाजेपासून
नवमी तिथि समाप्त- 12 ऑक्टोबर 2024 सकाळी 10:58 वाजेपर्यंत
11 ऑक्टोबर रोजी करावे कन्या पूजन: चैत्र किंवा शारदीय नवरात्रीत अष्टमी किंवा नवमी या तिथीला कन्या भोज आयोजित करावे. 11 ऑक्टोबर 2024 शुक्रवारी अष्टमी राहील. या दिवश नवमी पूजा देखील होईल आणि दुसर्या दिवशी नवमीचे पारण होईल. अशात 11 ऑक्टोबर रोजी कन्या पूजन आणि भोज करणे योग्य ठरेल.
नवरात्रीत कन्या पूजनाचे नियम:-
कन्या भोजपूर्वी कन्या पूजन केले जाते.
या दिवशी किमान 9 कन्यांना आमंत्रित करावे.
धार्मिक मान्यतेप्रमाणे 2 ते 10 वर्ष या वयातील कन्या कुमारिका पूजनासाठी योग्य असतात.
कन्यांसोबत एका मुलाला देखील आमंत्रित केले जाते. ज्याला हनुमानाचे रूप समजले जाते.
सर्व कन्यांना कुशाच्या आसानावर किंवा लाकडी पाटावर बसवून त्यांचे पाय पाण्याने किंवा दुधाने धुवावे.
नंतर स्वच्छ कपड्याने पुसावे आणि आलता लावून त्यांना चुनरी पांघरुन त्यांचा श्रृंगार करावा.
नंतर त्यांना कुंकु लावून त्यांची आराधना करावी.
त्यांना भोजन करवावे.
खीर, पूरी, प्रसाद, शिरा, चण्याची भाजी इतर पदार्थ खाऊ घालावे.
नंतर दक्षिणा द्यावी आणि भेटवस्तू देऊन त्यांना विदा करावे.