सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र संस्कृति
Written By
Last Modified: शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (22:00 IST)

Navratri : आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे

mahur devi
आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे,
रूप तुझं साजरं ग आई,
तळपते तू तेजाने बाई,
करू कशी मी तुझी उतराई,
आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे,
करुनी नाश तू पातकांचा,
फडकविला झेंडा तू ग यशाचा,
दाव मार्ग मजही पुण्याचा,
आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे,
घे ग माते आता तू अवतार,
पसरला ग खूप अंधार,
करावा तू ग मार्ग आमुचा सुकर,
आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे,
करीन आरती मी श्रद्धेने,
भरीन ओटी तुझी मायेने,
बोलींन वचन मी सत्याने,
आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे!!
करते आता तुझा उदोकार,
कर तो तुही प्रेमाने स्वीकार,
कर हलका माझा तू भार,
आई जगदंबे पाव तू मजला आई श्री जगदंबे,
उदो ग अंबे उदो, उदो ग अंबे उदो,
आई भवानी उदो, आई भवानी उदो!!
..अश्विनी थत्ते.