गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र संस्कृति
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (15:40 IST)

नवरात्र : गरबा का आणि कधीपासून केला जातो? गरब्याचा इतिहास काय?

gujarat garaba
'गरबा' हा गुजरातचा एक अनोखा कला प्रकार आहे, ज्याला गेल्या 5000 वर्षांच्या परंपरेचा वारसा लाभलाय. तुम्हाला क्वचितच असा गुजराती माणूस सापडेल ज्याचे पाय गरबा गाण्याच्या सुरांवर थिरकत नाहीत.
विक्रम संवताच्या शेवटच्या पंचावन्न दिवसांत सोळा श्राद्धानंतर नवरात्र सुरू होते.
 
पाऊस परतीची वाट धरू लागल्यावर शरद ऋतूचे आगमन होते.
 
अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसांपर्यंत नवरात्र सण साजरा केला जातो, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे.
 
'गरबा' या शब्दाच्या अर्थाबाबत आपल्याकडील तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
 
नरसिंहराव भोलानाथ दिवेटिया, केशव हर्षद ध्रुव, विजयराय वैद्य आणि के. शास्त्री यांच्यासारख्या गुजराती भाषेच्या जाणकारांनी 'गरबा'चा अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय.
 
केशव हर्षद ध्रुव यांनी त्याचा काहीसा वेगळा अर्थ लावलाय, तर के. शास्त्री याबाबत म्हणाले.
 
"मी दीपगर्भ घाटातील 'गरभा' वरून 'गरबा' हा शब्द काढला आहे. 'गरभा' या शब्दाचा अर्थ 'भांडे' किंवा 'घडा' असा होतो. छिद्र असलेल्या भांड्याला 'गरबा' म्हणतात."
 
"अखंड निर्दोष भांड्याला छिद्र पाडण्याला 'गरबाकोरव्यो' (गरबाकोरला) म्हणतात. भांड्यात मध्यभागी दिवा ठेवण्यालाही गरबा म्हणतात.
 
म्हणून असा अंदाज बांधला जाऊ शकतो की 'गर्भादीप' या मूळ संस्कृत शब्दावरून 'गरबो' हा शब्द आलाय."
 
"दीपगर्भ घाट: या शब्दप्रयोगात 'घाट'चा अर्थ लक्षात घेता 'दीपगर्भ' हे विशेषणासारखे भासते."
 
"कालांतराने, 'दीपगर्भ' या शब्दाचे 'दीप' हे पूर्वपद हरवले, 'गर्भ' हा शब्द राहिला आणि त्यातून 'गरबो' हा शब्द अस्तित्वात आला."
 
"अशा प्रकारे 'गरबो' या शब्दाचा अर्थ छिद्र असलेले मातीचे किंवा धातूचे भांडे असा झाला. हा 'गरबो' दैवी शक्तीचे प्रतीक बनला."
 
"नवरात्रीच्या काळात असा गरबा डोक्यावर घेऊन किंवा मध्यभागी उभे राहून 'कुंडलो' गाण्याची परंपरा आहे."
 
"वरवर पाहता असे लक्षात येते की नवरात्रीत गायल्या जाणा-या देवाची स्तुती करणा-या आणि पराक्रमांच्या कवितांना 'गरबा' हे नाव पडले. पहिला 'गरबो' वल्लभ मेवाडा यांनी लिहिला. या गरब्याच्या एकत्रित रसांमधून 'गरबा'ची निर्मिती झाली.
 
‘वल्लभ मेवाडो’ म्हणजे गरब्याचा समानार्थी शब्द
भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक डॉ. हजरत कल्लोलिनी यांनी गरब्याविषयी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचे नाव आहे: 'मारो गरबा घूम्यो'.
 
पुस्तकातील माहितीनुसार, "गरबाया शब्दाशी संबंधित वेगवेगळ्या भूमिकांची तीन नावे जोडलेली आहेत. ती तीन नावं म्हणजे नरसिंह मेहता, भंडास आणि वल्लभ मेवाडो."
 
"कृष्ण वसुदेव जसा देवकीचा मुलगा होता, तसा तो नंदा आणि जशोदाचाही मुलगा होता, त्याचप्रमाणे भंडासाचे नाव गरब्याच्या रूपाशी जोडलेलं आहे."
 
"तरी त्याची रुजवात आणि संगोपनाचं काम वल्लभ मेवाडो यांचं आहे, असं मानलं जातं आणि दयाराम यांनी त्याला प्रसिद्धी मिळवून दिली."
 
"वल्लभ मेवाडो हा गरब्याचा समानार्थी शब्द आहे. त्यांच्याकडून आपल्याला अफाट वैविध्य मिळाले आहे, पण वल्लभच्या गरब्याचा गाभा म्हणजे आईवरची निस्सीम भक्ती. 'माँ तू पवनी पतराणी के काली कालिका रे लोल' हा वल्लभचा सर्वात प्रसिद्ध 'गरबा' आहे."
 
रास आणि गरब्यात प्रथम काय येतं याबद्दल कुणाचेच एकमत नाही. 'रास'चा श्रीकृष्णाशी संबंध आहे आणि 'हरिवंश' आणि महाकवी भासाच्या ग्रंथात त्याचा उल्लेख असल्याने, ते याचं सर्वात जुनं रूप म्हणता येईल.
 
'रास' हा शब्द गुजराती असला तरी गुजरातपुरता मर्यादित नाही.
 
कृष्णभक्ती ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे, तर विराट प्रकृतीला अध्यामाता जगद्जन म्हणून पुराण काळापासून स्वीकारलं गेलंय.
 
अशाप्रकारे कृष्ण भक्ती आणि आद्यशक्ती उपासना हे रास आणि गरब्याचे जवळपास समानार्थी शब्द आहेत.
 
प्रत्येक गाणे गरब्याचे गाणे नसते
एक प्रकारे, या दोघांमध्ये बरंच साम्य आहे आणि नगण्य फरक आहेत. दोन्हीच्या केंद्रस्थानी धर्म असून वर्तुळाकार समूह नृत्यालाही तितकंच महत्त्व आहे.
 
महिला आणि पुरुष किंवा अविवाहित महिला किंवा अविवाहित पुरुष गाणी गाऊन 'दांडिया रास' खेळतात.
 
टाळ्यांसह, चक्कर मारता मारत स्त्रिया गातात त्याला ‘गरबा’ म्हणतात आणि गोल फिरत पुरुष जे गातात त्याला ‘गरबी’ म्हणतात.
 
गुजरातमध्ये 'गरबा'चे आगमन आणि तो तिथे स्थिरावण्यामागे एक रंजक इतिहास आहे.
 
प्रसिद्ध नाटककार गोवर्धन पांचाळ यांनी रामनारायण पाठक यांच्यासोबत लिहिलेल्या 'रास आणि गरबा' या पुस्तकात नोंद केली आहे.
 
गरबा हे नैसर्गिकरित्या स्त्रीलिंगी रूप म्हणून स्वीकारले गेले असल्याने, ती स्त्रीलिंगी अभिव्यक्ती मानली गेली पाहिजे ही त्यासाठीची पूर्वअट आहे.
 
प्रत्येक गरबा हे प्रथम गाणे असते, परंतु प्रत्येक गाणे गरबा नसते, मग गाण्याला गरबा बनवणारे मुख्य घटक कोणते?
 
ज्या गाण्यामध्ये स्त्रीचे भाव आणि भावना स्वतःच्या भूमिकेपासून इतर सर्वांच्या भूमिकेपर्यंत पोहोचतात, गाण्याचे बोल, काव्यात्मक अभिव्यक्ती जी मन:स्थिती आणि संगीत प्रतिबिंबित करते आणि जिथे टाळ्या वाजवत फिरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असते, ते गरबा असतं.
 
गरब्याचा संबंध आनंदाशी आहे
गरबा हे एक कला सादरीकरण आहे आणि कला सादरीकरणाचे जे काही दुर्गुण आहेत त्याची लागण यालाही झालेय आणि म्हणूनच अनेकदा केवळ शब्दांचा, संगीताचा मारा करणे म्हणजे खऱ्या अर्थाने गरबा नाही.
 
शहरातील वेगवेगळे गरबे बघत फिरणं आणि त्यात सहभागी होणं हा कलाकारासाठी वैयक्तिक आनंद असतो, पण त्याची कला पाहणारे आणि अनुभवणारे मित्र असतील तर त्याचा आनंद द्विगुणित होतो.
 
अर्थात, हे पाहण्यासाठी प्रेक्षक असायला हवेत, अन्यथा अशाप्रकारची नृत्यशैली लोकांना गोंधळात टाकू शकते.
 
गरबा विशेषतः महिला आणि त्यांच्या नाजूक संवेदनशीलतेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याच्याकडून लावंण्याची अपेक्षा करणे फारसं योग्य नाही.
 
ज्या गाण्यांमध्ये पुरूषी लालित्य अपेक्षित आहे अशी धारधार शब्द असलेली गाणी अनेकदा गाण्यांसारखी वाटतही नाहीत, त्यामुळे ती गरब्यासारखी वाटणंही अवघड असतं.
 
गरब्याचा संबंध कायम आनंदाशी जोडला जातो.
 
त्यामुळे तीव्र आणि दुःखद भावना व्यक्त करणारी, खिन्न करणारी नकारात्मक गाणीही तालाची क्षमता असूनही गरबा म्हणून सादर करावी लागतात.
 
या सगळ्याचा मथितार्थ हा आहे की कलाकृती म्हणून हा एक लवचिक कला प्रकार आहे आणि काळानुरुप त्यात होत असलेल्या बदलांनी हे खरं असल्याचं सिद्ध केलंय.
 
गुजराती लोकांचा सांस्कृतिक वारसा
प्रसिद्ध संगीतकार अविनाश व्यास यांनी एका मुलाखतीत गरब्याबद्दल सांगितलं की, "गरब्यात कोणतेही गाणे गायले जाऊ शकते. त्यासाठी चाल आणि तालाच्या जास्त गुंतागुंतीची गरज नाही."
 
"गरब्यात फक्त ठराविक ताल किंवा राग असावेत असे कोणीही ठरवलेलं नाही. गरबा बहुतेक या चार तालांमध्ये वापरला जातो.
 
(1) हिंच (सहा मात्रा. उदा- मा तू पावनी पटराणी) (2) खेमतो (सहा मात्रा, आषाढभरे ते आमी आलो) (3) केर्वो (आठ मात्रा, नगर नंदजीचा लाल) (4) दिपचंडी (14 मात्रा, रघुपती राम हृदयात असो). जरी लय वजनानुसार बदलली तरी हिंच आणि खेमतामध्ये मात्रा सारख्याच असतात."
 
"तथापि, या लोकप्रिय तालांव्यतिरिक्त, आटपाटा ताल (ठेका) मध्ये जो गरबा गायला जायचा तो मूळ तालापेक्षा वेगळा आहे. अधिकाधिक गरबे सारंग, भैरव, म्हाडमध्ये गायले जायचे. आता अनेक रागांमध्ये गरबा रचना आहेत, ज्यांचे स्वागत करायला हवे."
 
 
माता आणि कृष्णाच्या भक्तीने प्रेरित गरबा-गरबी मध्ययुगीन रचनांपैकी एक आहेत.
 
धार्मिक समाजाच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया हळूहळू समजून घेण्यासाठी आपल्या लोककथा पुरेशा आहेत.
 
प्रापंचिक जीवनातील अनेक आनंद, अनेक छोट्या-छोट्या चिंता, दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक सण-उत्सव आणि या स्त्री-हृदयाचा ठाव घेत वाहणारी भावनांची गुप्त गंगा या शब्दांत आपल्या लोकगीतांमध्ये याचे वर्णन करण्यात आलं आहे.
 
गरबा हे सामूहिक सांस्कृतिक आनंदाचे सर्वोत्तम साधन आहे.
 
आपल्या प्रापंचिक जीवनाचे मोठ्या प्रमाणावर चित्रण करणाऱ्या 'सरस्वतीचंद्र' या महाकाव्यातही लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांनी नायिका कुमदसुंदरीकडून हेच गाऊन घेतलं आहे.
 
ही वस्तुस्थिती गरब्याची लोकप्रियता सिद्ध करतं.
 
घरातील अंगण आणि चौकातून गरबारस्त्यावर आला आणि तीच गरब्याच्या प्रसाराची पहिली पायरी ठरली.
 
गरब्याने अंगण सोडलं असलं तरी तो पूर्णपणे त्यातून बाहेर पडलेला नाही, कारण बाहेर पडूनही तो कुणाच्यातरी अंगणात खेळला जात होता.
 
गरबाएखाद्या सार्वजनिक मालमत्तेप्रमाणे, एका अंगणातून दुसऱ्या अंगणात, एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर फिरतोय आणि त्याच्या आरंभापासूनच त्याने आपली मूळ गती कायम ठेवली आहे.
 
आधुनिक काळातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे त्याच्या गतीचे कोलाहलात रूपांतर झाले आहे आणि त्या गोंगाटात कवितेचे भावपूर्ण शब्द हरवून गेले आहेत.
 
जिथे माणूसच निसर्ग, संस्कृती आणि विकृती च्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जातोय, तिथे माणसाशी निगडित कलाप्रकार त्यातून कसे वाचू शकतात?
 
गरबा हा गुजराती लोकांचा सांस्कृतिक वारसा आहे.
 
पुन्हा एकदा लोकांनी त्याच्या कवितेचे आणि संगीताचे मूळ रूप समजून घेतले तर 'गरबो' आणि 'गरबी' टिकून राहतील.
 




















Published By- Priya Dixit