शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. नवरात्रि 2022
  3. नवरात्रि पूजा
Written By
Last Modified: बुधवार, 21 सप्टेंबर 2022 (11:32 IST)

Navratri 2022: चुकूनही ही कामे करू नका, देवी दुर्गा नाराज होऊ शकते

devi
नवरात्रीसाठी भक्त आधीच तयारी करतात. नवरात्रीमध्ये जे कोणी दुर्गेची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतो त्याच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी येते. तरी अशी काही कामे आहेत जी नवरात्रीत करू नये नाहीतर देवी नाराज होऊ शकते.
 
जाणून घ्या अशी कोणती कामे आहेत जी नवरात्रीत अजिबात करू नयेत.
 
लसूण-कांद्याचे सेवन टाळावे
प्रत्येकाच्या घरात लसूण-कांदा रोज सेवन केला जातो. अशा परिस्थितीत नवरात्रीमध्ये या गोष्टींचे सेवन करू नये याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
 
मांस- अल्कोहोल याचे सेवन टाळा
नवरात्रीचे नऊ दिवस मांसाहार व मद्यपान टाळावे. नऊ दिवस संपूर्ण सात्विक आहार घ्यावा.
 
मुलींचे मन दुखवू नका
कोणत्याही मुलीचे कशामुळेही मन दुखेल असे काहीही बोलू नये. नवरात्रीत नऊ दिवस या गोष्टीची विशेष काळजी घ्या.
 
घर रिकामे सोडू नका
जो कोणी आपल्या घरात कलशाची स्थापना करतो त्याने आपल्याला घराला कुलूप लावू नये किंवा घर रिकामे करुन बाहेर निघू नये.
 
अखंड ज्योत सांभाळा
जर तुम्ही तुमच्या घरात अखंड ज्योत पेटवली असेल तर ती अखंड ज्योत कोणत्याही कारणाने नऊ दिवस विझू नये याची विशेष काळजी घ्यावी.
 
धार्मिक गोष्टींमध्ये व्यस्त रहा
नवरात्रीच्या पवित्र दिवसात फालतू बोलण्यापेक्षा धार्मिक गोष्टींवर भर द्यावा, याची विशेष काळजी घ्यावी लागेल.