Bhagar Dhokala उपवासाचे ढोकळे
साहित्य : 200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, 100 ग्रॅम सिंगाड्याचे पीठ, चवीनुसार शेंद मीठ, एक वाटी दही, एक चमचा सोडा, तळण्यासाठी तेल व थोड जिरं.
कृती : भगर 2 तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला फेटून त्यात राजगिरा व सिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य टाकावे व त्यात एक चमचा सोडा व मीठ टाकून चांगले फेटून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिटी येऊ द्यावी. थंड झाल्यावर त्याचे काप करावे व तेल गरम करून त्यात जिर्याची फोडणी द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.