शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी जगत
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 8 सप्टेंबर 2022 (13:16 IST)

Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus लॉन्च, किंमत आणि फीचर्स जाणून घ्या-

Apple iPhone 14 Launch: अॅपल फॉर आउट इव्हेंटमध्ये कंपनीने आपली नवीन iPhone 14 Series लॉन्च केली आहे, या सीरीज अंतर्गत आयफोन 14, आयफोन 14 प्रो व्यतिरिक्त आयफोन 14 प्लस सोबत कंपनीची नवीन वॉच Apple Watch आणि नवीन बड्स लॉन्च करण्यात आले आहे.
 
iPhone 14 Series Price: 7 सप्टेबंर 2022 रोजी अॅप्पल (Apple) ने इतर प्रॉडक्ट्ससह iPhone 14 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीजबद्दल फॅन्स वाट बघत होते. यात नमूद केलेली बहुतेक वैशिष्‍ट्ये मालिकेच्‍या मॉडेलमध्‍ये दिसू शकतात आणि अनेक नवीन अॅडिशन्स आहेत, ज्याची चाहत्यांना आणि टिपस्‍टर दोघांनाही अपेक्षा नव्हती. आम्ही तुम्हाला केवळ iPhone 14 मालिकेतील वैशिष्ट्ये आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत. 
 
iPhone 14 चे फीचर्स 
Apple iPhone 14 आणि iPhone 14 Plus A15 बायोनिक चिपसेट वर काम करतील. iPhone Series मध्ये मिनी मॉडलऐवजी 14 Plus प्रस्तुत करण्यात आले आहे ज्यात 6.7 इंची OLED डिस्प्ले मिळतं परंतु नॉच तेच आहे. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max च्या नॉचला दुसर्‍यांदा डिझाइन केले गेले आहे. यात आपल्याला ऑलवेज ऑन डिस्प्ले देण्यात आले आहे. या दोन्ही फोन्समध्ये 2000nits ची ब्राइटनेस देण्यात आली आहे आणि प्रो मॉडल्स A16 बायोनिक चिपवर काम करत आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे तर iPhone 14 आणि iPhone 14 Plus चा कॅमेरा सेटअप तर 12+12MP आहे परंतु iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Plus 48MP चे प्रायमरी कॅमर्‍यासोबत लॉन्च केले गेले आहे. 
 
Apple iPhone 14 Plus Price in India
Apple iPhone 14 Plus ची भारतात किंमत 89,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्हालाही आयफोन 14 सीरीज अंतर्गत लॉन्च केलेले हे मॉडेल विकत घ्यायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या डिव्हाइसची विक्री 7 ऑक्टोबरपासून सुरू होईल.
 
Apple iPhone 14 Price in India
Apple iPhone 14 ची भारतीय बाजारात किंमत 79,900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. जर तुम्ही देखील हे मॉडेल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की या मॉडेलची विक्री ग्राहकांसाठी 16 सप्टेंबरपासून सुरू होईल.