मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (10:25 IST)

इतके स्वस्त मिळत आहे Xiaomi चे हे विस्फोटक स्मार्टफोन

आपण जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही आपल्यासाठी एक चांगली वेळ आहे. प्रमोशनला ऑफर अंतर्गत Xiaomi आपले बरेच स्मार्टफोन स्वस्तात विकत आहे. यात Redmi Note 6 Pro, Redmi Note 5 Pro आणि Redmi Y2 सारखे स्मार्टफोन सामील आहे. Xiaomi ची ही सेल 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील. याशिवाय, या फोनवर अनेक ऑफर देखील उपलब्ध असतील.
 
या सेलमध्ये Redmi Note 6 Pro चा 4 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 11,999 रुपये असेल. साधारणपणे त्याची किंमत 13,999 रुपये असते. 15,999 रुपयात विकला जाणार्‍या 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 13,999 राहील. Mi डॉट कॉम आणि फ्लिपकार्ट येथे Redmi Note 6 Pro वर 2,000 रुपये सवलत उपलब्ध आहे. 
 
Redmi Note 5 Pro चा 4 जीबी रॅम व्हेरिएंट 10,999 रुपये किंमतींत विकला जात आहे, दुसरीकडे त्याचा 6 जीबी रॅम व्हेरिएंट 11,999 रुपये किंमतींत उपलब्ध आहे. या फोनचे 4 जीबी आणि 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत क्रमशः 12,999 रुपये आणि 13,999 रुपये आहे. Redmi Note 5 Pro वर दिली जाणारी 2,000 रुपयांची सवलत प्रत्येक वेबसाइटवर उपलब्ध आहे. 
 
शाओमीच्या सेलमध्ये Redmi Y2 चा 3 जीबी रॅम व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. दुसरीकडे, या फोनचा 4 जीबी रॅम व्हेरिएंट 9,999 रुपये किंमतींत विकला जात आहे. Xiaomi आपल्या Redmi Y2 वर 1000 रुपये सवलत देत आहे. तथापि, कंपनीच्या अटी आणि शर्ती या किंमतींवर लागू आहेत.