बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (15:49 IST)

भारत आणि युरोप फिरण्याचे गोल्डन संधी, जेट एयरवेज देत आहे तिकिट बुकिंगमध्ये 50% ची सवलत

जेट एयरवेज देत आहे तुम्हाला घरगुती आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर 50 टक्क्यांची सवलत. पण हे डिस्काउंट फक्त बेस फेयरवर मिळेल न की फायनल तिकिट प्राइसवर. त्याच सोबत जर तुम्ही फॅमेली, फ़्रेंड्ससोबत ट्रॅव्हल करत असाल, सीनियर सिटिझन असेल किंवा सशस्त्र दलाचा भाग असाल तर 10 टक्क्यांची अतिरिक्त सूट देखील मिळू शकते. या ऑफरची मुदत फक्त 5 दिवसांसाठी आहे अर्थात 21 ते 25 फेब्रुवारीच्या दरम्यान बुक करणार्‍या तिकिटांवर याचा फायदा मिळेल.  
 
जेट एयरवेजहून तिकिट बुक करण्याअगोदर जाणून घ्या या नियमांबद्दल  
 
1. हे ऑफर वन वे आणि रिर्टन फ्लाईटवर लागू होईल.  
 
2. डिस्काउंट निवडलेल्या फ्लाईट्सच्या प्रीमियर आणि इकॉनॉमी जागांवर उपलब्ध राहील.  
 
3. प्रीमियर जागेवर ट्रॅव्हलिंगसाठी किमान 8 दिवस अगोदर किंवा 1 मार्च 2019 पासून तिकिट बुक करावे लागेल.  
 
4. इकॉनॉमी सीटने प्रवास करण्यासाठी 15 दिवस अगोदर किंवा 8 मार्च 2019पासून बुक करावी लागेल.  
 
5. हे ऑफर युरोप जाणार्‍या निवडलेल्या जेट एयरवेजवर लागू होईल. जेट एयरवेजच्या पार्टनर फ्लाईट्स जसे एयर फ्रांस आणि केएलएम रॉयल डच एयरलाइन्सवर देखील हे ऑफर लागू राहणार आहे.  
 
6. मुलांच्या तिकिटांवर मिळणारे डिस्काउंट्स, रीफंड चार्ज, विकेंड सरचार्ज इत्यादी फेयर रुलामध्ये देण्यात येणारी माहितीनुसार लागू होतील.