अ‍ॅपलच्या स्वस्त iPhone वर आकर्षक डिस्काउंटची ऑफर

apple
Last Modified बुधवार, 29 जुलै 2020 (22:21 IST)
अ‍ॅपलने काही महिन्यांपूर्वी भारतात आपला ‘स्वस्त’ SE 2020 लाँच केला. हा नवीन आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सध्या Apple Days सेल सुरू आहे. या सेलमध्ये अ‍ॅपलच्या ‘स्वस्त’ iPhone SE 2020 फोनवर आकर्षक डिस्काउंट मिळेल. पण, आज (दि.29) या सेलचा अखेरचा दिवस आहे.
काय आहे ऑफर? :-
iPhone SE 2020

फ्लिपकार्टवर iPhone SE ची (64GB) किंमत 40 हजार 999 रुपये आहे. मात्र, अ‍ॅपल डेज सेलमध्ये हा फोन 37 हजार399 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. म्हणजे या फोनवर 3 हजार 600 रुपये डिस्काउंट मिळत आहे. पण, या डिस्काउंटचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डद्वारे फोन खरेदी करावा लागेल. एचडीएफसी क्रेडिट कार्डने ईएमआयवर फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा होईल.
या ऑफरव्यतिरिक्त सेलमध्ये या फोनवर 14,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज डिस्काउंटचीही ऑफर आहे. याशिवाय फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्के कॅशबॅक मिळेल. तर, सेलमध्ये एचडीएफसी डेबिट कार्डवरही 1500 रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंटची ऑफर आहे. सेलमध्ये आयफोन SE च्या तिन्ही व्हेरिअंटवर डिस्काउंटची ऑफर आहे. म्हणजे 64GB व्हेरिअंट, 128GB व्हेरिअंट आणि 256GB व्हेरिअंटच्या खरेदीवर या ऑफरचा फायदा घेता येईल.
फीचर्स :-
नव्या आयफोनमध्ये सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. F/१.८ सह १२ मेगापिक्सेलचा हा कॅमेरा असून याद्वारे 4के व्हिडीओ शूट करता येणार आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यासोबतच यात एचडीआर आणि पोर्टेटसारखेही फिचर्स आहेत. ब्लॅक, व्हाईट आणि (प्रोडक्ट) रेड या रंगांच्या पर्यायात नवीन आयफोन उपलब्ध असेल.

iPhone SE 2020 मध्ये ४.७ इंचाचा रॅटिना HD IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये आयफोनच्या अत्याधुनिक A13 Bionic chip चा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या मोबाइलमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR10 चा सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G VoLTE, वायफाय 802.11ax, वायफाय कॉलिंग, NFC, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS देण्यात आलं आहे.
तसंच यामध्ये टच आयडी बटणही आहे. iPhone SE 2020 चा लुक iPhone 8 प्रमाणेच आहे. तसंच हा फोन IP67 रेटिंगसह येतो. त्यामुळे हा फोन डस्ट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. फोनची संपूर्ण बॉडी ग्लास आणि एअरोस्पेस ग्रेड अ‍ॅल्युमिनिअमपासून बनली आहे. तसंच फोनमध्ये वायरलेस चार्जिंगचाही पर्याय देण्यात आला आहे.

फास्ट चार्जिंगसह केवळ अर्ध्या तासात हा फोन ५० टक्क्यांपर्यंत चार्ज होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

अयोध्येतील राममंदिर निर्माण...

अयोध्येतील राममंदिर निर्माण...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्र सरकारने गठित केलेल्या राम मंदिर निर्मिती ...

अमेरिकेतही अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आकर्षण

अमेरिकेतही अयोध्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आकर्षण
अयोध्येमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा ...

'ज्युबी-आर' नावाने रेमडेसिवीर जेनेरिक औषध बाजारात आले

'ज्युबी-आर' नावाने रेमडेसिवीर जेनेरिक औषध बाजारात आले
भारतातील औषध उत्पादक कंपनी ज्युबिलंट लाइफ सायन्सेसने करोना महामारीवर उपचार करण्यासाठी एक ...

चीनमधील 'या' दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली

चीनमधील 'या' दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली
Weibo आणि Baidu Search या चीनमधील दोन प्रसिद्ध अ‍ॅपवरही भारताने बंदी घातली आहे. भारताने ...

UPSC चा निकाल जाहीर, एकूण ८२९ उमेदवारांची निवड

UPSC चा निकाल जाहीर, एकूण ८२९ उमेदवारांची निवड
केंद्रिय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०१९ चे निकाल जाहीर