शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

जिओला ‘६’ सीरिजचे नवे नंबर देण्याची परवानगी

दूरसंचार विभागाकडून रिलायन्स जिओला नव्या सीरिजचे नंबर देण्याची परवानगी मिळाली असून हा नंबर ‘६’ सीरिजचा असल्याची माहिती आहे. ६ सीरिजचा एमएससी (मोबाईल स्विचिंग कोड) जारी करण्यासाठी रिलायन्स जिओला दूरसंचार विभागाकडून परवानगी मिळाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिओच्या काही ठराविक सर्कलमध्येच ६ सीरिजचे नंबर वितरीत केले जातील. जिओ सध्या मिळालेल्या परवानगीनुसार एमएससी नंबर आसाम, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये वितरीत करणार आहे. राज्यस्थानमध्ये ६००१०-६००१९, आसाममध्ये ६००३०-६००३९ आणि तामिळनाडूमध्ये ६००४०-६००४९ असा एमएससी कोड असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.या सीरिजचे नंबर जिओने दिले तर ६ सीरिजचे नंबर देणारी ही पहिलीच दूरसंचार कंपनी असेल. आतापर्यंत ९, ८ आणि ७ या सीरिजचे नंबर जारी करण्यात आले आहेत. दूरसंचार विभागाने या सीरिजला परवानगी देण्यामागे जिओचे वाढते युझर्स हे कारण असल्याचे बोलले जात आहे.