मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑक्टोबर 2017 (19:35 IST)

iPhone 8 Plus फुटल्याचा दोन घटना

iPhone 8 Plus फुटण्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. एक घटना तायवानमध्ये तर दुसरी घटना जपानमध्ये घडली आहे. डॅमेज झालेल्या फोनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. 

तायवानमध्ये एका ग्राहकाने  iPhone 8 Plus चा पाच दिवस वापर केला. पण त्यानंतर चार्जिंग दरम्यान  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झाले. बॅटरी फुगल्यामुळे हा प्रकार झाल्याचा दावा ग्राहकाने केला आहे. 

दूसरी घटना जपानमध्ये घडली आहे. फोन आल्यानंतर बॉक्स उघडला असता  iPhone 8 Plus चे पार्ट्स वेगळे झालेलं पाहिलं असा दावा कस्टमरने केला आहे. 

अॅपलने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. या कथित घटनेनंतर अॅपलने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. MacRumors ला अॅपलच्या प्रवक्त्याने आम्हाला या प्रकरणाची माहिती असून  या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत असं सांगितलं.