बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2019 (17:12 IST)

Samsung Galaxy A30 च्या किंमतीत कपात, नवीन किंमत जाणून घ्या

सॅमसंगने आपल्या Galaxy A30 ची किंमत कमी केली आहे. आता हा मॉडेल आपल्याला 1500 रुपये कमी किमतीत मिळू शकेल. ही कपात केल्यानंतर या फोनची किंमत आता 13,990 रुपये झाली आहे. तथापि ही किंमत कायमची आहे वा तातत्पुरती हे अद्याप ज्ञात नाही. 
 
Galaxy A30 च्या कमी किंमतीनंतर आता या प्रकरणाची चर्चा जोर पकडत आहे की Samsung आता लवकरच Galaxy A40 लॉन्च करू शकतो. काही महिन्यांपूर्वी सॅमसंगने 16,990 रुपयांच्या सुरुवाती किंमतीसह Galaxy A30 लॉन्च केलं होतं. 
 
या फोनमध्ये Infinity-U नॉचसह 6.4 इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले दिला गेला आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज सह येणार्या या फोनमध्ये Samsung च्या Exynos9610 चिपसेटचा वापर केला गेला आहे. कॅमेरा सेटअप अंतर्गत बॅक पॅनलवर 16 मेगापिक्सेल प्रायमरेशूटरसह 5 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी आपल्याला यात 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. अँड्रॉइड 9पाईसह यात 4,000 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.