शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जून 2019 (18:26 IST)

Samsung Galaxy M40 झाला लॉन्च 19,990 मध्ये 6GB रॅम आणि ट्रिपल कॅमेरा

सॅमसंगने भारतात आपल्या Galaxy M सिरीजचा या फोनचे नाव Samsung Galaxy M40 आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. त्यासह फ्रंटमध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आलं आहे, जे एक पंच होल डिस्प्ले आहे. पंच होल सेल्फी कॅमेरेसाठी वापरलं जातं. या फोनमध्ये 6GB रॅम देखील उपलब्ध आहे.
 
कंपनीने या फोनची किंमत 19,990 रुपये निश्चित केली आहे. या किंमतीत 6GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी मिळेल. Amazon.in वर याची विक्री 18 जूनपासून सुरू होणार आहे. या फोनमध्ये 6.3 इंच full-HD+ Infinity-O Display देण्यात आलं आहे. स्क्रीन संरक्षणासाठी देखील कंपनीने कॉर्निंग गोरिला ग्लास 3 सुरक्षा स्तर वापरला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसरसह एड्रिनो 612 जीपीयू सपोर्ट प्रदान केलं आहे. 
 
या फोनमध्ये 32 मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आहे, जे एआय सीन ऑप्टीमाइझरसह येतं. 5 मेगापिक्सेल सेकेंडरी सेन्सर आणि तिसरा सेन्सर डेप्थ सेन्सर म्हणून कार्य करतो, जो 8 मेगापिक्सेलचा असतो. सेल्फीसाठी त्यात 6 मेगापिक्सेल सेंसर दिला गेला आहे.