बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 26 जानेवारी 2019 (00:56 IST)

एलजी आणणार आहे जेस्चर कंट्रोल वाला फोन

एलजी लवकरच आपला जेस्टर कंट्रोल सिस्टम असणारा स्मार्टफोन सादर करणार आहे. यासाठी त्याने व्हिडिओ काढला आहे. एलजी ने मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (MWC) इवेंटचा इनवाइट सार्वजनिक केले आहे. एलजीचा इवेंट 24 फेब्रुवारी रोजी बार्सिलोनामध्ये आयोजित होणार आहे. इनवाइटच्या टॅगलाइनवर लक्ष्य दिले तर आम्ही या दक्षिण कोरियाई कंपनीचे पुढील स्मार्टफोनमध्ये गेस्चर कंट्रोलची अपेक्षा करू शकतो.   
 
व्हिडिओत एक हात हालवत टेक्स्टला समन आणि डिसमिस करताना दाखवण्यात आले आहे. त्याशिवाय अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे. फक्त स्क्रीनवर दोन शब्द दिसतात - Goodbye Touch। या व्हिडिओत वापर करण्यात आलेले टेक्स्ट आणि अॅक्शन तर हेच सांगत आहे की कंपनी या इवेंटमध्ये कुठल्या प्रकारची  गेस्चर कंट्रोल टेक्नॉलॉजीवरून पडदा उचलणार आहे. अद्याप हे स्पष्ट झाले नाही की एलजीच्या पुढील फ्लॅगशिप हेंडसेटला एलजी जी8 च्या नावाने बोलवण्यात येईल.  
 
नुकतेच एलजी जी8ची ग्राफिक्सने तयार फोटो समोर आले होते, ज्याने स्पष्ट झाले होते की एलजी जी8मध्ये कंपनीने एलजी जी7+ थिंकच्या डिझाइनचा वापर केले आहे.  फोटो सांगत आहे की स्मार्टफोन ग्लास-सँडविच डिझाइन असणारा असेल आणि मध्ये मेटल फ्रेमला जागा मिळेल. मागच्या भागात डिझाइन थोडे वेगळे आहे. या फोनचा  डुअल कॅमरा सेटअप हॉरिझाँटल पोझिशनमध्ये असेल.