गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

मोबाईलची किंमत एक लाख रुपये

भारतात जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रोनिक उत्पादन करत असलेल्या पॅनासॉनिक इंडियाने तीन टफपॅड डिव्हाईस मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. यामध्ये टफपॅड एफझेड-F1 आणि टफपॅड एफझेड-N1 यांचा समावेश आहे. त्याचसोबत टफपॅड एफझेड-A2 टॅबलेट लॉन्च करण्यात आला आहे. बिझनेस क्लाससाठी बनवलेल्या या तिन्ही प्रीमियम डिव्हाईसचं खास वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटी आहे. तर हे बनविताना कंपनीने सर्वात श्रीमंत ग्राहक समोर ठेवला असून यामध्ये या नवीन अँड्रॉईड डिव्हाईसची किंमत 99 हजार रुपये आहे. 
 
दुसरा जो फोन आहे विंडोज 10 वर आधिरत स्मार्टफोनची किंमत 1 लाख 9 हजार रुपये आहे. टॅब्लेटही अँड्रॉईडवर सुरु होणार असून , त्याची किंमत 1 लाख 20 हजार रुपये आहे. मूळ किंमतीशिवाय प्रत्येक डिव्हाईसवर अतिरिक्त टॅक्स आकारला जाणार असून कंपनीने तसे प्रसिद्ध केले आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या ऑपरेटिंग सिस्टम वेगळ्या आहेत.