रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By

Jioचा धमाल: 4जी फोनची बुकिंग लवकरच सुरू, असे करा रजिस्टर

रिलायंस जियोचे फीचर 4 जी फोनचा ग्राहक बर्‍याच वेळेपासून वाट बघत आहे. फोनची घोषणा रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेयरमॅन मुकेश अंबानी यांनी कंपनीची 21 जुलै रोजी झालेल्या एजीएमच्या बैठकात केली होती.   
 
रिलायंस जियो फोनची बीटा टेस्टिंग कंपनी मंगळवार पासून सुरू करत आहे. कंपनी ही टेस्टिंग काही विशेष मोबाइल फोनवर करेल. यानंतर 24 ऑगस्टला फीचर फोनसाठी बुकिंग सुरू करण्यात येईल. तसेच, फोनची  डिलिवरी पुढील महिन्यात अर्थात सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. कंपनी फोनची डिलिवरी आधी या आधी मिळावा आधारावर करत आहे.  
 
जियो 4जी फीचर फोन असे करा बुक 
 
- रिलांयस जियो 4जी फीचर फोनची बुकिंग करण्यासाठी सर्वांत आधी यूजर्सला जियोची आधिकारिक वेबसाइट www.jio.com वर जावे लागणार आहे. त्यानंतर तेथे कीप मी पोस्टेड वर क्लिक करावे लागणार आहे.  
 
- तेथे ग्राहकांकडून काही डिटेल्स विचारण्यात येईल. जसे स्वत:साठी फोन घ्यायचा आहे की बिझनससाठी. सांगायचे म्हणजे सामान्य ग्राहकांना एकच फोन मिळेल. तसेच बिजनेससाठी घेत असलेल्या लोकांसाठी एकापेक्षा जास्त फोन मिळू शकतील.   
 
- वेबसाइटवर तुमचे नाव, ईमेल आयडी, फोन नंबर, पिन कोड इत्यादी माहिती मागण्यात येईल.  
 
- रजिस्ट्रेशन केल्यानंतर कंपनी ग्राहकांना जियो फोनबद्दल एसएमएस आणि ईमेलच्या माध्यमाने माहिती देत राहणार आहे.  
 
जियो फोनचे रजिस्ट्रेशन ग्राहक माय जियो ऐपच्या माध्यमाने देखील करू शकता. तसेच रिलायंस जियोचे   आधिकारिक स्टोअरवर देखील फोनची बुकिंग करण्यात येईल.   
 
एवढी किंमत द्यावी लागणार आहे  
 
जियो फीचर फोनची प्रभावी किंमत 'शून्य' ठेवण्यात आली आहे अर्थात जियो फोन ग्राहकांना मोफत मिळेल. पण ग्राहकांना सिक्योरिटी मनी म्हणून 1500 रुपये द्यावे लागणार आहे. ही धनराशी तीन वर्षांनंतर फोन परत करताना परत मिळतील.  
 
काय आहे या फोनचे फीचर्स जाणून घ्या 
अल्फान्यूमेरिक कीपॅड, 4वे नेवीगेशन, कॉम्पॅक्ट डिझाइन, फोन कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, 2.4'' क्यूवीजीए डिस्प्ले, एसडी कार्ड स्लॉट-कॅमरा, मायक्रोफोन आणि स्पीकर, हेडफोन जॅक, रिंगटोन्स, टॉर्च, एफएम रेडियो, 4जी VoLTE तंत्रावर आधारित.