1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Modified: बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (16:47 IST)

सॅमसंगच्या मेगा इव्हेंटमध्ये आज कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन लॉन्च होणार

सॅमसंग या वर्षातील आपल्या मोठ्या कार्यक्रमासाठी सज्ज आहे. सॅमसंग  Galaxy चा मेगा 2022 इव्हेंट आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या इव्हेंटमध्ये सर्वात पावरफुल स्मार्टफोन Samsung Galaxy S22 सीरीज लॉन्च होईल.  
 
हा कार्यक्रम मेटाव्हर्समध्येही होणार आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8:30 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे. आपण कंपनीच्या वेबसाइटवरून ही ते तपासू शकता.  
 
नवीन Galaxy सीरीजबद्दल अजून जास्त माहिती समोर आलेली नाही, पण टीझरच्या माध्यमातून कंपनीने याबाबत बरेच काही संकेत दिले आहेत. जर जुना पॅटर्न पाहिला तर Samsung Galaxy S22, Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra नवीन सीरीजमध्ये लॉन्च होतील.  
 
असे मानले जाते की Galaxy S22 Ultra मध्ये SPen सपोर्टसाठी पोर्ट देखील दिला जाऊ शकतो. Samsung Galaxy S22 आणि Galaxy S22+ जवळजवळ समान वैशिष्ट्यांसह येऊ शकतात, परंतु स्क्रीन आकार आणि कॅमेरा गुणवत्ता सुधारली जाऊ शकते.  
 
Galaxy S22 Ultra मध्ये सर्वात मोठा डिस्प्ले आकार असू शकतो. Galaxy S22 आणि Galaxy S22+ च्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरे दिले जाऊ शकतात. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेल असू शकतो. यासोबत 12-12 मेगापिक्सलचे सेन्सरही दिले जाऊ शकतात. 

Samsung Galaxy S22 Ultra च्या कॅमेऱ्यात खूप फरक दिसून येतो. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108-मेगापिक्सेल असू शकतो. यासह  10-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड शूटर दिला जाऊ शकतो.  

Galaxy S22+ आणि Galaxy S22 Ultra मध्ये 12GB पर्यंत RAM चा पर्याय दिला जाऊ शकतो तर Galaxy S22 मध्ये 8GB पर्यंत RAM पर्याय असू शकतो. निवडक मार्केटसाठी Galaxy S22 Ultra मध्ये 1TB इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे.  
 
किंमतीबाबत अद्याप कोणतीही नवीन माहिती समोर आलेली नाही. मागील रिपोर्टनुसार, Samsung Galaxy S22 ची किंमत 70,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते. 

या इव्हेंटमध्ये Galaxy S22 सीरीज व्यतिरिक्त Galaxy Tab S8 Ultra देखील लॉन्च केला जाईल.