सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: शनिवार, 22 ऑक्टोबर 2016 (14:46 IST)

व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं

जगात आणि आपल्या देशात सर्वात प्रसिद्ध असलेल्या सोशल अॅप ने  व्हॉट्सअ‍ॅप ने त्यांच्या युझर्सला अजून  नविन फिचरची भेट दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरु केलं आहे.मात्र हे फीचर सध्या विंडोज फोनवरच बिटा व्हर्जनवर उपलब्ध आहे. हे व्हिडीओ कॉलिंग फीचर अँड्रॉइड आणि आयओएस साठी कधी उपलब्ध होणार याविषयी ठोस माहिती नाही. मात्र सध्या जरी फक्त विंडोज फोनवर व्हॉट्सअ‍ॅपने व्हिडीओ कॉलिंग फीचर उपलब्ध असले तरी लवकरच अँड्रॉइड आणि आयओएस साठी हे फिचर उपलब्ध होईल अशी आशा करायला हरकत नाही . त्यामुळे आता या नवीन फिचर मुळे स्काईप आदी मेसेंजिंग अ‍ॅप व्हिडीओला मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.