95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे.
RRR या चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
आरआरआर या तेलुगू सिनेमातील नाटू नाटू हे गाणं इतकं लोकप्रिय झालंय की, इंटरनेटवर त्याचीच चर्चा आहे. आता तर हे गाणं ओरिजन साँगचा पुरस्कारासाठी ऑस्करच्या शर्यतीत आहे. बीबीसी कल्चरच्या चारुकेशी रामदुरै यांनी या गाण्याच्या लोकप्रियतेची कारणं सांगितली आहेत.
दाढीवाला एक हिंदुस्तानी तरूण इंग्रजाला उद्देशून विचारतो की, “सालसा नाही, फ्लेमेंकोही नाही, तुला नाटूबद्दल माहित आहे का?” त्या इंग्रजाच्या उत्तराची वाट न पाहताच, तो तरूण त्याच्या मित्रासोबत त्या गाण्यावर थिरकू लागतो. सिनेपडदा गाजवणाऱ्या या गाण्यानं अनेकांना प्रत्यक्षातही थिरकायला लावलंय.
परदेशींच्या त्या कार्यक्रमात अल्लुरी सीतारामा राजू (राम चरण तेजा), कुमारम भीम (एनटी रामाराव ज्युनियर) आपल्या हसऱ्या चेहऱ्याने आणि पँटच्या पट्ट्याच्या सहाय्यानं थिरकण्यास सुरुवात करतात आणि कमालीचा वेग धरतात.
अत्यंत आकर्षक युरोपियन सूट परिधान करून नृत्याविष्कार केला गेलाय. सिनेमातल्या गाण्याच्या या सीनमध्ये खलनायक असलेल्या इंग्रजाला आपण केवळ जॅक नावानं ओळखत असतो.
सुरुवातीला तो इंग्रज सीतारामा राजू आणि कुमारम भीम यांच्या नृत्याला बेक्कार आणि अश्लिल म्हणत फटकारतो. मात्र, नंतर जॅकही स्वत:ला रोखू शकत नाही. थोड्या वेळानं तर राजू आणि कुमारन यांच्यासोबत थिरकू लागतो.
मग नाचून नाचून तो थकतो आणि जमिनीवर कोसळतो. तर दुसरीकडे, राजू आणि भीम नाचत नाचतच निघून जातात. जणूकाही या नृत्यातच त्यांचा विजय आहे. ज्या गाण्यावर हे नाचत असतात, ते गाणं म्हणजे तेलुगू ब्लॉकबस्टर राईज, रोअर, रिव्हॉल्ट.... आरआरआर सिनेमातील नाटू नाटू होय.
नाटू शब्दाचा अर्थ अस्सल देशी आहे. इथल्या मातीच्या सुगंधाची अभिव्यक्ती आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्या गोष्टीशी नातं सांगतो, ज्या गोष्टींना इथल्या मातीचा गंध आहे.
जेवण करताना अचानक मधेच तुम्ही हिरव्या मिर्चीचा तुकडा खाता आणि तुम्हाला अस्सल चवीचा आस्वाद मिळतो. किंवा एखाद्या नगाड्यावर थाप मारताना तुमच्या शरीरातून शहारा उसळी मारतो आणि हृदय धडधड करू लागतो.
खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं गीत
नाटू नाटू गाणं या सिनेमाचा खऱ्या अर्थानं आशय आहे. आरआरआर सिनेमात स्वातंत्र्याचे दोन नाटू योद्धा ताकदवान ब्रिटिशांशी भिडतात.
या सिनेमात ब्रिटिश साम्राज्याचं प्रतिनिधित्त्व एक इंग्रज अधिकारी गव्हर्नर स्कॉट बक्स्टन आणि त्याची पत्नी बीवी कॅथरिन करतात.
त्यांच्यासोबत ब्रिटिश सत्तेचे काही छोटे-मोठे अधिकारी असतात. जे कायम भारतीय लोकांना थप्पड मारत राहतात किंवा धडका देत राहतात. मात्र, राजू आणि भीम आपल्या शौर्यानं ब्रिटिशांना झुकण्यास भाग पाडतात.
हे गाणं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं गीत आहे. यात एक कमकुवत लोक नाचता नाचता अजिंक्य समजल्या जाणाऱ्या ब्रिटिशांना आव्हान देतात आणि नमतं घ्यायला लावतात.
मुळात आरआरआर सिनेमाची कथा ऐतिहासिक घटनांवर आधारित असल्यानं, देशभक्तीची भावना कथानकात आहे. त्यामुळे या सिनेमानं भारतात प्रचंड कमाई करणं आश्चर्यकारक नव्हतं. मात्र, परदेशातही या सिनेमानं मोठी कमाई केलीय.
आरआरआर सिनेमानं 2022 मधील सर्वोत्तम सिनेमांच्या यादीत आपली नोंद केलीय. जपानमध्ये तर आतापर्यंत सगळ्यात जास्त कमाई करणारा भारतीय सिनेमा म्हणून आरआरआरची नोंद झालीय.
प्रसिद्ध अमेरिकन मासिक न्यूयॉर्करने आरआरआर सिनेमचा दिग्दर्शख राजामौली यांची मुलाखत घेतली. त्यात राजामौली म्हणाले की, आरआरआर सिनेमा गरजेपेक्षा जास्त फॅन्टसी सिनेमा आहे, जो आनंद देतो.
राजामौलींनी यावर्षी जानेवारीत न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल अवॉर्डमध्ये सर्वोत्तम दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला. अमेरिकेतील रोलिंग स्टोनने आरआरआर सिनेमाला 2022 मधील सर्वोत्तम आणि क्रांतिकारी ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणून गौरवलं होतं.
याबाबत कुणाचंच दुमत नाहीय की, आरआरआरच्या यशाचं एक कारण सिनेमातील नाटू नाटू हे गाणं आहे. अमेरिकेतील व्हरायटी या वृत्तपत्राने सिनेमा आणि संगीताच्या नसा पकडणारं गाणं म्हणून नाटू नाटूचा गौरव केला.
नाटू नाटू गाण्यानं तेव्हाही इतिहास रचला, जेव्हा रिहाना, टेलर स्विफ्ट आणि लेडी गागा यांना मागे टाकत बेस्ट ओरिजनल गाण्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला होता.
सोशल मीडियावर सुद्धा चर्चा
आज हे गाणं प्रत्येकाच्या ओठावर आहे तरी हे फार वेगळं गाणं आहे असं इथल्या लोकांना वाटत नाही.
दक्षिण भारतीय चित्रपटात साऊंड डिझायनर म्हणून काम करणारे आनंद कृष्णमूर्ती म्हणतात की हे गाणं थिरकायला भाग पाडतं मात्र भारतीय लोकांनी यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाची गाणी ऐकली आहेत. ज्यांनी चित्रपट पहायचा फारसा अनुभव नाही त्यांच्यासाठी हे गाणं खचितच वेगळं आहे. मात्र या गाण्याचा वेगळा प्रभाव आहे हे मात्र नक्की.
लेखिका रीमा खोखर यांनाही हे गाणं प्रचंड भावलं. वीजेच्या तारेचा झटका लागावा याप्रमाणे पावलं थिरकायला लागतात. गेल्या अनेक वर्षांत अशा प्रकारचं गाणं पहायला मिळालेलं नाही असं त्या म्हणतात.
या गाण्याला बेस्ट ओरिजिनल साँग साठी नामनिर्देशित झाल्याचा आनंद मात्र कृष्णमूर्ती यांना झाला आहे.
याआधी स्लमडॉग मिलेनिअरच्या वेळी अशी चर्चा झाली होती. तेव्हा जय हो गाण्याला हा पुरस्कार मिळाला होता. तो चित्रपट पूर्णपणे भारतीय नव्हता. त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन डॅनी बॉयल ने केलं होतं.
मोठ्या कॅनव्हासवर चित्रित
नाटू नाटू गाण्याचं चित्रीकरण एका विशाल कॅनव्हासवर झालं आहे हे गाणं 2021 मध्ये युक्रेनची राजधावी कीव्हमध्ये असलेल्या राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की च्या घरासमोर झालं आहे.
या गाण्याच्या स्वरुपामुळे नाटू नाटू गाणं बेस्ट ओरजिनल साँग हा पुरस्कार मिळवण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांकावर आहे. या गाण्याच्या स्टेप्स ने टिक टॉकवर धमाल उडवून दिली होती.
सोशल मीडियावर अनेक लोकांनी साडेचार मिनिटाच्या या गाण्याची नक्कल करून तो सीन पुन्हा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला होता.
अनेक लोकांनी हा डान्स इतरांनाही शिकवायला सुरुवात केली होती. त्यातीलच प्रेम रक्षित यांनी हा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकला. त्यावर फक्त अमेरिकेतल्या लोकांचाही मोठा प्रतिसाद मिळाला, पण हा चित्रपटही लोकांना फार आवडला.
रीमा खोखर यांनी पहिल्यांदा हे गाणं इन्स्टावर पहिलं. त्यांच्या मते आता कोणतंही गाणं प्रसिद्ध व्हायचं असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणंही तितकंच गरजेचं आहे.
जेव्हा नाटू नाटू नो गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला तेव्हा प्रसिद्ध संगीतकार ए. आर रहमान यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. तेव्हा त्यांनी मोठा बदल असल्याचं सूचित केलं. नाटू नाटूला ऑस्कर जिंकण्याची मोठी संधी आहे.
यावरून या अकादमी आपण किती विविधांगी आहोत हे दाखवण्याची नामी संधी मिळेल.
Published By -Smita Joshi