शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. ऑस्कर
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2024 (15:08 IST)

ऑस्कर अवॉर्ड दरम्यान जोरात पडली अभिनेत्री

oscar
Photo - Twitter
96 वा ऑस्कर अवॉर्ड सोहळा नुकताच पार पडला.हा अवॉर्ड सोहळा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. हा अवॉर्ड हॉलिवूड असो किंवा बॉलिवूड असो प्रत्येक कलाकारांना मिळावा अशी त्यांची इच्छा असते. अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडलेल्या सोहळ्यात ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ओपनहायमर चित्रपटाचाच वरचष्मा पाहायला मिळाला.सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने पटकावला आहे. या अवॉर्ड सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या अवॉर्ड सोहळ्यामध्ये अनेक कलाकारांनी रेड कार्पेटवर काही पोज दिले. या दरम्यान एक अभिनेत्री रेड कार्पेटवर जोरात पडली. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लिझा कोशी असे या अभिनेत्रींचे नाव आहे. ती रेडकार्पेटवर पोझ देताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली नंतर तीने स्वतःला अतिशय व्यवस्थितरित्या हाताळले.तिच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अभिनेत्रीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. ती रेड कार्पेटवर पोहोचल्यावर तिचा पाय घसरला आणि ती जोरात खाली पडली. ती पडल्यावर स्वतःला सावरते नंतर हसते. नंतर दोघे जण तिला मदतीसाठी येतात. तेव्हा ती म्हणते तिथे मॅनहोल असल्यामुळे झाले. मी ठीक आहे. ती प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधते आणि म्हणते की  मी या ऑस्कर अवॉर्ड शो मध्ये सहभागी होण्यासाठी इतकी उत्साहित होते की  मी रेड कार्पेटवर पडले. 
 
 Edited by - Priya Dixit