1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. स्वतःला घडवताना
Written By
Last Modified शुक्रवार, 31 मार्च 2023 (22:54 IST)

How much salary किती वेतन घ्याल?

अनेकदा चांगली नोकरी मिळण्याची शक्यता असूनही वेतनाच्या मुद्यावर आपण अडून राहतो आणि त्यामुळे नोकरी मिळण्यात अडचणी येतात. हे टाळण्यासाठी वेतनाच्या बाबतीत बोलताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पदवी किंवा कोणत्याही प्रकारचं उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकजण उत्तम नोकरी मिलवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यासाठी तरूणाईला बरेच परिश्रम घ्यावे लागतात. काहीवेळा त्यामध्ये चटकन यश येतं तर काही वेळा अपयशही पदरी येतं. अनेकदा असं होतं की इंटरव्ह्यू नोकरी मिळण्याचा दृष्टीने उत्तम झालेला असतो. पण वेतनाच्या मुद्यावर गाडी अटकते. अनेकदा नोकरी मिळण्याची योग्यता असूनही वेतनाच्या मुद्यामुळे अडचणी येतात. इंटरव्ह्यू आपल्या दृष्टीने चांगला झालेला असतो. त्यावेळी आपल्याला किती वेतन अपेक्षित आहे, असा प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे इंटरव्ह्यू ही अशी जागा नाही की ज्या ठिकाणी आपण वेतन हा प्रमुख मुद्दा बनवावा आणि त्याबाबतच बोलत रहावं. त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
 
आपण याआधी एखाद्द्या ठिकाणी नोकरी करत असाल तर तिथे किती वेतन मिळत होतं हे लक्षात घ्यावं. नव्याने नोकरी स्वीकारत असाल तर तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना किती वेतन मिळतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आपण आधी नोकरी करत असाल तर आधीचं वेतन लक्षात घेऊन त्यानुसार नवीन जवाबदारी स्वीकारताना अपेक्षित वेतनाच्या बाबतीत तर्कसंगत उत्तर देऊ शकता. अवास्तव वाटेल इतक्या जास्त वेतनाची मागणी न करता वर्तमान वेतनाच्या 20 ते 25 टक्के जास्त वेतनाची मागणी आपण करू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे वास्तविकता काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. इंटरव्ह्यूला जाण्याआधी पूर्ण तयारी करून जावं आणि ज्या कंपनीत आपण नोकरीसाठी जाणार आहात त्या कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्याची माहिती मिळाली तर कंपनीकडून आपल्या किती वेतनाची ऑफर होऊल शकेल, हे आपल्या लक्षात येण्यास मदत येईल. त्यानंतर आपण आपल्या वास्तविक स्थितीही मजबूतीने मांडू शकतर. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ठराविक किंवा निश्चित वेतन सांगण्याऐवजी त्याची रेंज सांगण्याच्या प्रयत्न करावा. याबाबतीत कठोर भूमिका न घेणेच चांगलं ठरेल. अनेकदा वर्क प्रोफाईल आणि ब्रँड यांनाही इतर सर्व गोष्टीपेक्षा अधिक महत्त्व असतं. त्यामुळे एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी मिळत असेल तर ठराविक वेतनासाठीच अडून बसू नये. वेतन प्राप्तिच्या बाबत कठोर भूमिका घेण्याएवजी मवाळ धोरण स्वीकारलं तर आपली इच्छित नोकरी आपल्यापर्यंत पोहचू शकेल.
 
आपण आधी एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर येथील वेतन सांगण्याच्या बाबतीत प्रामाणिकपणा दाखवायला हवा. नव्या कंपनीत जास्त वेतन मिळालं पाहिजे म्हणून आधीच्या नोकरीत जास्त वेतन होतं असं सांगू नये. याचं कारण आपल्याला सॅलरी स्लीप जमा करण्यास सांगितलं जाऊ शकतं. त्यासप्रमाणे आपण ज्या ठिकाणी नोकरी करत होतात त्या संस्थेमध्ये आपल्या वेतनाबाबतची पडताळणी होऊ शकते. नवीन नोकरी स्वीकारताना आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणी आणि तणावांच्या बाबतीत बोलू नये. इंटरव्ह्यूच्या वेळी आपल्या घरगुती अडचणी आणि आर्थिक स्थिती याबाबतही बोलणं टाळावं. त्याचप्रमाणे आपल्या सर्व गोष्टी पैशांच्या बाबतीत केंद्रीत असता काम नयेत. त्याऐवजी आपल्या नोकरीवर ठेवल्यास ते त्या कंपनीसाठी कसं फायदेशीर ठरेल हे सांगणच्या प्रयत्न करावा. आपला अनुभव आपल्या बाबतीत सर्व काही सांगणारा असतो. वेतनाच्या बाबतीत बोलताना आपल्याला देण्यात आलेल्या कामाविषयीही रूची दाखवावी. जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी आपल्या देहबोलीचा (बॉडी लँग्वेज) अंदाजही असायला हवा.