संबंधित माहिती
- 'बुली बाय' अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपी इंजिनीअरिंग विद्यार्थ्याला बेंगळुरू येथून अटक केली
- अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका संकेतस्थळावर मिळणार, पारदर्शकतेसाठी निर्णय
- इंजिनिअर्स डे : अभियांत्रिकीचं शिक्षण पू्र्ण करून इतर क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणाऱ्या 7 व्यक्ती
- मराठीतून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्याने नोकरीच्या संधीवर परिणाम होईल का?
- शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट; सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा
इंजिनीअरींग, फार्मसी, कृषी सीईटीसाठी या तारखेपासून करता येणार अर्ज
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. अर्ज सादर करण्याकरिता आणि अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कळविले आहे.
