गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. परीक्षेची तयारी
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (21:23 IST)

प्रवेश परीक्षेची Entrance Exam ची तयारी कशी करावी टिप्स जाणून घ्या

आपल्या आयुष्यात कारकीर्दी किंवा करियरचे महत्त्व आहे.प्रत्येक विद्यार्थी अशी इच्छा बाळगतो की त्याने आयुष्यात काही मिळविण्यासाठी अभ्यासाबद्दल नेहमी जागरूक असले पाहिजे. आपल्या अभ्यासाच्या दरम्यान मौल्यवान वेळ वाया जाऊ नये. वर्ष भर अभ्यास केल्यावर परीक्षेची  वेळ जवळ आल्यावर विद्यार्थ्यांवर चांगले मार्क मिळविण्यासाठी दबाव येतं तर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यावर चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये देखील प्रवेश मिळावा जेणे करून पुढील अभ्यासक्रम व्यवस्थित सुरू राहील.या साठी विद्यार्थ्याला पाहिजे की त्याने चौकस राहून त्या शिक्षण संस्थेबद्दल माहिती मिळवावी आणि त्यामध्ये प्रवेश मिळवावा. 
सध्या कोणत्याही अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्या प्रवेश परीक्षेत पासिंग गुण किंवा ग्रेडिंग गुण घेण्यास असमर्थ झाला तर त्याला त्या चांगल्या शिक्षण संस्थेत प्रवेश मिळत नाही. या परिस्थितीत त्यांचे वर्ष वाया जाते. असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत.जेणे करून प्रवेश परीक्षेची तयारी सहज करून त्यामध्ये यश मिळवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या.
 या साठी विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्यांना अवलंबवून प्रवेश परीक्षेत यश मिळवू शकतात.  
 
* करियर साठी सज्ज राहा- 
बरेच विद्यार्थी वर्षभर अभ्यासाची तयारी करतात आणि परीक्षेत यश देखील मिळवतात. असं असून देखील ते चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विहित वेळेत फॉर्म भरत नाही आणि त्यांच्या हातून चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये ऍडमिशन मिळवण्याची संधी निघून जाते. अशा परिस्थितीत मुलांना या संदर्भात सर्व माहिती असावी की या संस्थेमध्ये कधी फॉर्म मिळणार आहे किंवा कधी परीक्षेचे फॉर्म भरावयाचे आहे. विध्यार्थ्यांना पाहिजे की आपल्याला काय करावयाचे आहे त्याच्या कडे सूक्ष्म निरीक्षण असावे. आणि प्रवेश परीक्षेच्या फॉर्म भरण्याकडे लक्ष देऊन प्रवेश अर्ज भरला पाहिजे. 
 
* एकाच पर्यायावर अवलंबून राहू नका- 
बऱ्याच वेळा विद्यार्थी चांगल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळवू इच्छित असतात आणि त्यासाठी तयारी देखील तशी करतात पण काही कारणास्तव त्यांना त्या प्रवेश परीक्षेत यश मिळत नाही. त्यांना त्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळत नाही परिणामी तो वर्ष वाया जातो कारण त्यांनी त्याच ठिकाणीच प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज केले होते. इतर ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी फॉर्मचा भरले नव्हते. असं करू नये कधीही एकाच पर्यायावर अवलंबून राहू नये. अन्यथा त्यांच्या कडे पुढील शिक्षणासाठी काहीच पर्याय नसणार आणि त्यांचे वर्ष वाया जातात. 
  
* प्रवेश परीक्षांच्या नियमांकडे लक्ष द्या- 
बऱ्याचशा शैक्षणिक संस्थेमध्ये बरेच नियम बनविले जातात. काही ठिकाणी Entrance Exam च्या आधारे ठरलेल्या जागेनुसार प्रवेश दिले जाते. अशा परिस्थितीत ज्या विद्यार्थ्यांचे गुण जास्त असतात त्यांनाच प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त असते. काही ठिकाणी गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना असावी. 
 
* प्रवेश परीक्षेची माहिती मिळवा-
प्रवेश परीक्षेशी निगडित सर्व माहिती  मिळवावी. परीक्षा कशी होणार, काय काय प्रश्न विचारले जाणार,यासाठी मॉडेल प्रश्नपत्र सोडवावे. पेपर किती तासाचा असेल,गुणांक किती असणार ही सर्व माहिती विद्यार्थ्यांनी मिळवावी. 
 
* प्रवेश परीक्षेसाठी काय वाचावे- 
 
विद्यार्थ्यांचा मनात संभ्रम असते की प्रवेश परीक्षेसाठी त्यांनी काय वाचावे म्हणजे ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण होऊन नवीन कक्षेत प्रवेश मिळवू शकतील. या साठी त्यांना ज्या विषयासाठी संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे त्या विषयावर जास्त लक्ष केंद्रित करावे. प्रश्नपत्रांचे पॅटर्न सांगितले असेल तर त्यानुसार तयारी करा. 
 
* भीती आणि काळजीपासून स्वतःला दूर ठेवा- 
कोणतेही काम करण्यापूर्वी लोकांच्या मनात काळजी आणि भीती असते. आणि काळजी आणि भीती पोटी आपले काम बिघडतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पाहिजे  की मन शांत आणि स्थिर ठेवून पुढील अभ्यासाची तयारी करावी.
 
* अति आत्मविश्वास टाळावा- 
बऱ्याच वेळा असे बघण्यात आले आहे की काही विध्यार्थ्यांना अति आत्मविश्वास असतो की ते सहज या परीक्षेत उत्तीर्ण होतील. अशा विद्यार्थ्यांना अति आत्मविश्वासापासून दूर राहावे. काहीही चुका न करता त्यांनी आपले लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. जेणे करून यश नक्की मिळेल.