बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (00:20 IST)

पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 119 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (सोमवार) पुणे शहरातील नवीन रुग्णांची संख्या दीडशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Pune Corona) संख्या अडीच हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 185 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 236 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
 
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89 हजार 021 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 78 हजार 119 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 07 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 03 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 8816 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
पुण्यात 2086 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
 
पुणे शहरामध्ये सध्या 2086 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 199 रुग्ण गंभीर आहेत. तर 340 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 6313 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 29 लाख 50 हजार 276 तपासणी करण्यात आल्या आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)