बुधवार, 5 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 (19:53 IST)

शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्या 13 वर्षीय रोहनचा मृत्यू

death
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचा वावर वाढला असून गेल्या 20 दिवसांत रविवारी दुपारी बिबट्याचा तिसरा बळी झाला आहे. रविवारी दुपारी बिबट्याने 13 वर्षीय रोहन विलास बोंबे याच्यावर हल्ला करून त्याला उसाचा शेतात नेले. बिबट्याच्या हल्ल्यात रोहनचा मृत्यू झाला. संतप्त ग्रामस्थांनी या प्रकरणी वनविभागविरोधात आक्रमक भूमिका घेतली. 
ग्रामस्थांनी संतापून वनविभागाची गाडी पेटवली बेस केम्पचे कार्यालयाला पेटवले. तसेच थोर भूमिका घेऊ पर्यंत रोहनचे शवविच्छेदन आणि अंत्य संस्कार केले जाणार नाही 
सदर घटना रविवारी सुपारी 4:15 वाजेच्या सुमारासची घडली आहे. रोहन घराबाहेर खेळत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहन वर हल्ला केला आणि त्याला उसाचा शेतात ओढत नेले. बराच वेळ रोहन दिसला नाही म्हणून लोकांनी त्याला शोधायला सुरु केले. तरुणांनी त्याला शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण झाले. 
या पूर्वी बिबट्याने 12 ऑक्टोबर रोजी शिवण्या बोंबे आणि 22 ऑक्टोबर रोजी भागुबाई जाधव यांना बळी बनवले. 20 दिवसांत तीन माणसे बळी गेल्यावर मात्र नागरिकांनी संताप व्यक्त केला असून घटनेनन्तर पंचतळे आणि रोडेवाडी फाटावर दीड ते 2 हजार ग्रामस्थांनी रास्तेरोको आंदोलन केले आणि वाहतूक कोंडी केली. परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला. प्रशासनाने या वर काही उपाययोजना केल्या नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचे गावकरी म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit