मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (17:11 IST)

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा आरोपी प्रथमेश हा चांगला मित्र आहेत, आरोपी प्रथमेशनं संधी साधत तिला आपल्या घरे बोलावले. जबरदस्ती करत तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याचवेळी आरोपीने तिचे नग्नावस्थेतील फोटोही काढले. यानंतर पुन्हा पीडित तरुणीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा पिंपरी चिंचवड येथील फ्लॅटवर बोलावलं. तिथे या आरोपी प्रथमेशने पुन्हा पीडितेवर बलात्कार केला. त्यावेळी त्याचे दोन मित्र स्वराज कदम व अन्य एका अनोळखी तरुण तिथे उपस्थित होते. त्यांनीही पीडित तरुणीवर बलात्कार केला. पुन्हा तरुणीला विवस्त्र करता तिचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये किल्क केले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलीने घरी येत कुटुंबियाच्या सोबत पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली.
 
पीडित मुलीने सहकारनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र बलात्काराची घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडित तरुणीचा मित्र प्रथमेश उर्फ सनी खैरे याच्यासह स्वराज कदम आणि अन्य एका अनोळखी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.