मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जानेवारी 2025 (14:22 IST)

पुण्यात नवीन विषाणू गुलेन बॅरी सिंड्रोमचे सापडले 22 संशयित रुग्ण, महापालिका अलर्टमोड़ मध्ये

hmpv virus
पुण्यात नवीन विषाणूचा शिरकाव झाला आहे. या नवीन विषाणूचे नाव आहे गुलेन बॅरी सिंड्रोम. पुण्यात या विषाणूचे 22 संशयित रुग्ण सापडले आहे. रुग्णांचे नमूने आय सी एम आर एन आय व्ही साठी पाठविले आहे. या विषाणूचे रुग्ण पुण्यात सापडल्यामुळे महापालिका देखील एक्शन मोड़ मध्ये आली आहे. तपसणीचा अहवाल आल्यावर रुग्ण सापडल्या भागात टीम दाखल होणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार लाखांमध्ये एकालाच आढळतो. 

पुण्यातील सापडलेल्या या संशयित 22 रुग्णांपैकी 6 रुग्ण पुण्यातील आहे तर इतर रुग्ण हे जिल्ह्यातील आहे. हे उपचारासाठी पुण्यात आले आहे. या रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्यांच्या  स्पाइनल फ्लूडची चाचणी केली जाते. 
 
रुग्णांच्या उपचाराधीन रुग्णालयाच्या परिसराची तपासणी देखील घेतली जाणार आहे.  हा आजार संसर्गजन्य नाही. वेगळ्या पद्धतीच्या वेक्सीन घेतलेल्या किवा H1N1 ची लस घेतलेल्या व्यक्तींना हा आजार होउ शकतो.हा आजार धोकादायक नाही. यावर प्लाज्मा एक्सचेंज सारखे उपाय केले जातात. 
 
गुलेन बॅरी सिंड्रोम आहे तरी काय ?
या आजाराचा विषाणू नसांवर परिणाम करते. या आजारामुळे स्नायु कमकुवत होतात. स्नायु कमकुवत झाल्यामुळे संवेदना कमी होऊन वेदना होतात. चेहरा, डोळा, छाती, स्नायु वर परिणाम करणारा, तात्पुरता अर्धांगवायुचा आणि श्वसनाचा त्रास होतो. हाताची बोटे,पायात वेदना होणे, चालताना त्रास होणे, चिड़चिड़ होणे आणि चेहऱ्यावर कमजोरी असणे या आजाराची लक्षणे आहे.  
Edited By - Priya Dixit