गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जुलै 2024 (15:10 IST)

व्यावसायिक वादातून साथीदाराने केले व्यावसायिकाचे अपहरण, पुणे पोलिसांनी सुटका केली

pune police
व्यावसायिक वादातून एका 30 वर्षीय व्यावसायिकाची तीन जणांनी 22 जुलै रोजी अपहरण केले. या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय कापड व्यावसायिक हेमंत कुमार रावल यांनी कपूरी राम घांची, प्रकाश पवार आणि गणेश पात्रा या तिघांसोबत कापडाचा व्यवसाय सुरु केला. घांची हा रावलला अहमदाबादहून कापड पुरवायचा आणि रावल त्या कपड्यांचा पुरवठा पुण्यात करायचा. रावल आणि कपूरी राम घांची हे दोघे राजस्थानच्या सिरोहीचे रहिवासी आहे. त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यात मैत्री झाली. 

घांची याचे पुण्यातील कोंढवा येथे रेडिमेड कपड्यांचे आणि ड्रेस मटेरियलची दोन दुकाने आहे. कोविड काळात रावळ यांना व्यवसायातून नुकसान झाले. आणि ते कपड्यांचा पुरवठा करू शकले नाही. 

घांचीने त्यांना कॉल केल्यावर त्यांनी काहीच प्रत्युत्तर दिले नाही. आणि फोन बंद करून दिला. रावल  हे आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचे घांची यांना कळाले. घांचीने पुण्यातील आपल्या मित्रांसह रावलचे अपहरण करण्याचा कट रचला. रावल 21 जुलै रोजी सकाळी मित्रांसोबत काळबादेवी येथील एका बार मधून रस्त्यावरून पायी जात असताना बळजबरी कार मध्ये बसवून पुण्यात नेले.त्यांना मारहाण केली.  

रावलच्या मित्राने याची माहिती पोलिसांना दिली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी गाडीची नंबरप्लेट ओळखून आरोपींना अटक केली. या अपहरणात वापरण्यात आलेल्या  वाहनाला पोलिसांनी जप्त केले आहे. न्य दोघे फरार आहेत. तिघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत अपहरण, दुखापत आणि बीएनएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Edited By- Priya Dixit