गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 25 जून 2024 (20:03 IST)

भावाकडून बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या,आरोपीला अटक

murder
पुण्यातील येरवडा भागात एका तरुणाने बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि मृतदेह ताब्यात घेतले आणि शव विच्छेदन साठी पाठविले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. इस्माईल शेख असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीची बहीण तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचा राग तरुणाला आला आणि त्याने असे कृत्य केले.  
 
सदर घटना येरवडा ठाण्यातील भागात घडली आहे. या भागात लहाडे आणि शेख हे कुटुंब राहतात. शेख याच्या बहिणेचे शेजारी राहणाऱ्या लहाडे या तरुणाशी प्रेम संबंध जुडले.वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे दोन्ही कुटुंबाला हे नाते मान्य नव्हते.त्यामुळे ते दोघे घरातून पळून गेले. 

याचा राग इस्माईलला आला आणि त्याने बहिणीच्या प्रियकराच्या वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. आणि पसार झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाईल. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला काही तासांतच अटक केली. त्याने हत्या केल्याचे कबूल केले असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit