1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 23 जून 2024 (17:05 IST)

Pune Bus Accident:पुण्यात प्रवाशांनी भरलेली बस झाडावर आदळून अपघात, 22 प्रवासी जखमी

यवत गावातील सहजपूर फाट्याजवळ परिवहन बस झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात 20 ते 22 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या पैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वाटेत अचानक एक ट्रक थांबला आणि बस चालकाने धडक टाळण्यासाठी बस वळवली, त्यानंतर बसचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

बसची धडक ट्रक पासून वाचवण्यात एसटी महामंडळाची बस झाडावर जाऊन आदळली आणि अपघात झाला. अपघातानंतर संपूर्ण परिसरात लोकांचा आरडाओरडा सुरु झाला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 
अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून बसमधील लोकांना बाहेर काढले आणि लोणी काळभोरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

एसटी महामंडळाची बस पंढरपूर हुन मुंबईला जात होती. दौंड तालुक्यातील यवतजवळील सहजपूर गावात सहजपूर फाट्याजवळ बस झाडावरआदळल्याने 20 ते 22 प्रवासी जखमी झाले. 

Edited by - Priya Dixit