रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जून 2024 (11:41 IST)

सायकल चालवत असलेल्या 10 वर्षाच्या चिमुरड्याला कारने चिरडले

child death
पुणे- 10 वर्षीय समर्थ शिंदे हा त्यांच्या परिसरातील एका मैदानात सायकल चालवत होता. दरम्यान एक कार अचानक वळली आणि समर्थला धडकली. या धडकेमुळे समर्थ सायकलवरून पडून कारखाली आला. त्याला तातडीने हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
 
इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे मंगळवारी (18 जून) पहाटे हा अपघात झाला. समर्थ ज्या ठिकाणी सायकल चालवत होता, त्याच मैदानात आरोपी कार चालकही ड्रायव्हिंग शिकत होता. कार चालक फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात घडला. चिमुकला गाडीच्या पुढील व मागील चाकाखाली आली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
 
समर्थ शिंदे चौथीत शिकत होता. सुशील शिंदे यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताच्या वेळी आरोपी कार चालवायला शिकत होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.