सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील घरकुल येथील पालिकेकडून वाटप न झालेल्या सदनिकांचा बेकायदेशीरपणे ताबा घेतल्या प्रकरणी भाजपच्या माजी नगरसेवकासह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना चिखली येथे घडली.
माजी नगरसेवक भीमा सखाराम बोबडे (रा. यमुनानगर, निगडी),युवराज सूर्यभान कोकाटे (रा. नेवाळे वस्ती, चिखली),अशोक रामभाऊ धोंडे,धन्यकुमार अंकुशराव पुजारी,निवृत्ती कृष्णा पवार,भगवान लिंबाजी लांडगे, विजय बळीराम गायकवाड,भगवान दगडू कांबळे,वसंत लक्ष्मण गुरव,सूर्यकांत मलप्पा बनसोडे,शिवाजी हनुमंत जाधव, नवनाथ रामचंद्र फडतरे विजय नारायण जोगदंड,बालाजी गोरोबा शिखरे,बालाजी विश्वनाथ गायकवाड,अशोक सखाराम चव्हाण,भिकु महादेव पोहाडे,देवानंद सदाशिव खांबे,सुरेंद्र त्रिंबकराव ढोणे,रवींद्र माणिकराव बोरकर,राम व्यंकटी गायकवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
गजानन मारुती गावडे (वय 37 रा. धायरी पुणे) यांनी शनिवारी (दि. 24) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांनी घरकुलाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे.मात्र या घराचे महापालिकेकडून अधिकृत वाटप झालेले नाही.आरोपींनी आपसांत संगनमत करून डी-12 येथील इमारतीचा बेकायदेशीरपणे ताबा घेऊन 42 सदनिकांचा ताबा घेतला.याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.