1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (16:19 IST)

डोणजेत अल्पवयीन मुलीवर 5 तरुणांनी सामूहिक बलात्कार केला

A minor girl was gang-raped by 5 youths in Donjeet डोणजेत अल्पवयीन मुलीवर 5 तरुणांनी  सामूहिक बलात्कार केला Marathi Pune News
पुण्याच्या खडकवासला डोणजे तालुका हवेली येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपींनी मुलीवर सामूहिक अत्याचार करून त्याचे व्हिडीओ बनवले आणि या घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. घाबरून मुली आणि आईला पोलिसांनी विश्वासात घेत माहिती मिळवली. हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास करत आहे. 
निलेश नेटके(21) ,लक्ष्मण पाटील (22)अशी या आरोपीची नावे आहेत. या गुन्ह्यात इतर तीन आरोपींचा देखील समावेश आहे. या प्रकरणात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला गेला आहे. या प्रकरणातील दोन आरोपी दोन दिवसापूर्वीच एका मुलावर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात सहभागी आहे. आरोपी निलेश ला अटक केले असून  आरोपी लक्ष्मण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या परिसरात दिन दिवसातच अशी घटना घडल्यामुळे रहिवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. परिसरातील लोकांना आता काळजी वाटत आहे.