शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (09:39 IST)

भरचौकात पैलवानाची गोळ्या घालून निर्घृण हत्या

पुणे जिल्ह्यात तालुका खेडच्या शेलपिंपळगावात भर चौकात एका पैलवानाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. नागेश सुभाष कराळे  असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोर काळ्या रंगाच्या मोटारीतून आले होते. या घटनेमुळे परिसर हादरले आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, नागेश कराळे हे गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास शेल पिंपळ गावात रस्त्याच्या कडेला लावलेल्या आपल्या मोटारीत बसत असताना अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात त्यांच्यावर गोळ्या झाडून  पसार झाले. त्यांच्या वर एकापाठोपाठ एक गोळ्या झाडण्यात आल्या. असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यांना गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी नाकाबंदी केली असून चाकण पोलीस अधिक तपास करत आहे .