सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (18:47 IST)

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भरधाव कारची ट्र्कला धडक होऊन अपघातात चौघांचा जागीच मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भरधाव कारची ट्रकला पाठीमागून जोरदार धडक होऊन भीषण अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 
हा अपघात पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवर गहुंजे स्टेडियम जवळ शनिवारी दुपारी 4:15 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगाने असलेली ही स्कोडा कार रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला जाऊन धडकली आणि या अपघातात कार चक्काचूर होऊन त्यात बसलेले चौघे जागीच मृत्युमुखी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांचे मृतदेह कार मधून काढण्याचं काम सुरु आहे. मयत इसमाची माहिती अद्याप कळू शकली नाही.