1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
  4. MNS three office bearers resign in Pune

पुण्यात मनसेला गळती, आतापर्यंत तीन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुण्यात मोठी गळती लागण्याची शक्यता आहे. मनसेचा पुण्यातील प्रमुख चेहरा असलेल्या वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले.त्यानंतर आणखी एका पदाधिकाऱ्यांने राजीनामा दिला आहे. शहराचे उपाध्यक्ष अझरुद्दीन बशीर सय्यद यांनीसुद्धा मनसेच्या आपल्या पदाचा राजीनामा दिलाय.
 
मनसे शाखा अध्यक्ष माजीद शेख, मनसेचे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष शाहबाज पंजाबी यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मनसे शहर उपाध्यक्ष आझरुद्दीन बशीर सय्यद यांनी राजीनामा दिला. आतापर्यंत पुण्यातील मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मनसेला गळती लागली आहे. 
पुढील लेख
आम्ही CGPL कंपनीकडून अतिरिक्त वीज विकत घेणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती