शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated :पुणे , बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (12:44 IST)

लेकीचं लय भारी स्वागत

pune baby girl
पुण्यातील खेड तालुक्यातील शेल पिंपळगाव येथे लेकीच्या जन्माचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. झरेकर कुटुंबियांनी मुलगी हीच आपली वंशाचा दिवा आहे असं समजून मुलीच्या जन्माचं जंगी स्वागत केलं आहे. कुटुंबाने आपल्या नवजात बाळाला हेलिकॉप्टरने घरी आणले आहे.
  
मुलीचे वडील विशाल झरेकर यांनी सांगितले की, आमच्या कुटुंबात मुलगी नाही. म्हणून आम्ही आमच्या मुलीची गृहप्रवेश विशेष करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एक लाख रुपये खर्च करून त्याला घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. घरात लक्ष्मीच्या आगमनाने आपण खूप आनंदी आहोत, असे ते म्हणाले.