सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (21:21 IST)

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासाठी लावलेले बॅनर चर्चेत

chandrakant patil
“पुणे शहरातील कोथरूड मतदार संघातील आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिनाभरापासून हरवले आहेत. कोणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा, समस्त कोथरुडकर. ”असा संदेश या बॅनरवर आहे आणि यावर देखील चंद्रकांत पाटील यांचा फोटो आहे.
 
कोथरुड परिसरात लागलेले हे बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय बनले आहेत. शिवाय, सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहेत. हे बॅनर नेमके कोणी लावले हे मात्र गुपितच आहे. 
 
सध्या कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्त कोल्हापूरमध्येच ठाण मांडून बसल्याचे दिसत आहे. परिणामी त्यांचा विधानसभा मतदार संघ असलेल्या कोथरुडमध्ये नागरिकांनी त्यांना परत बोलवण्यासाठी ही शक्कल लढवली आहे.