गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (12:11 IST)

पुण्यात तरुणाची कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

suicide
पुण्यात एका तरुणाने कंत्राटदाराच्या त्रासाला कंटाळून स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वारजे येथे घडली आहे. 

मयत तरुणाच्या मित्राने कंत्राटदाराकडून 25 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र त्याने न फेडता तो उत्तरप्रदेशात निघून गेला.या वरून कंत्राटदाराने मयताला उसने पैसे घेण्यासाठी त्रास द्यायला सुरु केले.  

या कंत्राटदाराने 30 सप्टेंबर रोजी रात्री मयत आणि इतर दोन मजुरांना एका खोलीत बंद करून मारहाण केली. 
या बाबतची माहिती मयत तरुणाने आपल्या आईला उत्तरप्रदेशात दिली. पैसे न दिल्याने कंत्राटदाराने तरुणाला शिवीगाळ केली. सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आणि पोटावर वार करून  आत्महत्या केली. त्याच्या मित्रांनी त्याची अवस्था पाहता तातडीनं रुग्णालयात नेले असता रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळतातच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला. 
या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या कंत्राटदाराला अटक केली आहे. प्रकरणाची पुढील कारवाई सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit