1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 3 जून 2024 (19:07 IST)

काळेवाडीत सिलेंडरच्या स्फोटाने गादी कारख्यानाला आग

fire
काळेवाडीत विजय नगर परिसरात सकाळी 11 वाजेच्या सुमारास आग लागली.सदर घटना विजय नगर परिसरात एका पत्र्याच्या शेड मध्ये दोन कारखाने आणि एका गोदामाला आग लागली. या कारखान्यात गादी आणि पेपरप्लेट बनवण्याचे काम सुरु असे. कारखान्याच्या गोदामात सिलेंडर होते.

आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन मोठ्याने आवाज आला आणि आग भडकली. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसर हादरला. घटनास्थळी दाखल झाले. जवानांचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आगीवर 1 वाजेच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात यश आले. 
 
परिसरात आगीचे लोट उंच उठत असून आजूबाजूच्या परिसरात धूर पसरला होता. आगीची माहिती मिळाल्यावर पिंपरी -चिंचवड अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. 
पोलिसांनी काळेवाडीहून विजयनगर कडे जाणाऱ्या रस्त्याला पोलिसांनी बंद केलं होत. आगीच्या ठिकाणी दोन कारखान्यात गादी, पेपर प्लेट बनवल्या जात होती. या अग्निकांडात सुमारे आठ ते दहा लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
 
Edited By - Priya Dixit