गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जुलै 2024 (12:44 IST)

पुण्यातील प्रेमप्रकरणातून केलेल्या हत्याच्या आरोपीला 9 दिवसांची पोलीस कोठडी

jail
पुण्यातील तळेगावात प्रेम प्रकरणातून गर्भवती झालेल्या महिलेचा मृत्यू गर्भपात करताना झाला. आरोपीने मित्रासह मृतदेह नदीत फेकले. महिलेचे दोन्ही मुले आईचा मृतदेह पाहून रडू लागले तर आरोपीने मित्राच्या मदतीने दोन्ही मुलांना जिवंतपणे इंद्रायणी नदीत फेकले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

गजेंद्र जगन्नाथ दगडखैर आणि रविकांत भानुदास गायकवाड असे या आरोपींची नावे आहे. या दोघांसह गर्भपाताला मदत करणारी महिला एजंट आणि ठाण्यातील रुग्णालयातील डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांना चौकशी दरम्यान माहिती मिळाली की महिलेच्या प्रियकरणाने गर्भवती महिलेचा गर्भपात करण्यासाठी तिला आपल्या मित्रासह ठाण्याला पाठवले तिथे गर्भपात करताना डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला. डॉक्टरने याची माहिती पोलिसांना दिली नाही.

महिलेचा मृतदेह घेऊन आरोपी आणि त्याचा मित्र मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंदोरी येथे इंद्रायणी नदीच्या पुलावर आणले आणि नदीपात्रात फेकून दिले. महिलेच्या मुलांना आईचा मृतदेह पाहून रडू कोसळले. मुलांना रडताना पाहून आरोपीने बिंग फुटू नये म्हणून दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे इंद्रायणी नदीपात्रात फेकले. 

आरोपींना अटक केली असून पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना 9 दिवसांची 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. 
Edited By- Priya Dixit