शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 14 जून 2022 (19:18 IST)

अजितदादांचं भाषण डावललं ?

ajit pawar
PM.Narendra Modi Dehu Visit: देहूत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आहेत. शिळा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमानंतर देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  देवेंद्र फडणवीस यांची भाषणे झाली .मात्र उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे भाषणे झाले नाही. कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर पंत प्रधान मोदी यांचे नाव पुकारण्यात आले. त्यावेळी अजित पवार यांचे भाषण का नाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर नरेंद्र मोदींचे भाषण झालं.त्यामुळे आता सर्वत्र नवा राजकीय वाद सुरु झाला आहे. हा कार्यक्रम दिल्लीतून पंतप्रधान कार्यालयातून ठरल्याची माहिती तुकाराम महाराज संस्थांनचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे. मुंबईत पंत प्रधान मोदी यांचे पुढील कार्यक्रम असल्यामुळे त्यांचे अजित पवार यांचे भाषणे झाले नसावे. कार्यक्रमांनंतर पंत प्रधान मोदी यांचे भाषणे झाले आणि देवेंद्र फडणवीस यांचे भाषण देखील झाले परंतु अजित पवार यांचे भाषण झाले नाही त्यामुळे अजित दादा पवार यांचे भाषणे का डावललं या वर प्रश्न उदभवत आहे. 
 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देहू कार्यक्रमात भाषण न होणे हा राज्याचा अपमान असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार यांचे भाषण डावलले म्हणून राजकीय वाद सुरु झाला आहे.