सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 17 जुलै 2024 (17:11 IST)

अजित पवार गटातील अजित गव्हाणे यांच्यासह समर्थक माजी नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला

ajit panwar
पिंपरी चिंचवड शहरात शहराध्यक्ष पदावरून अजित गव्हाणे यांनी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देण्याचे सांगितले. आज अजित गव्हाणे यांनी काही पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या मुळेबालेकिल्ला असलेल्या पिंपरी -चिंचवड शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. 

अजित गव्हाणे यांनी आज पुण्यात राहुल भोसले, यश साने, पंकज भालेकर, माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, संगीता ताम्हाणे, संजय उदावंत, गीता  मंचरकर, विनया तापीकर, शुभांगी बोऱ्हाडे, वैशाली उबाळे, अनुराधा गोफणे, प्रवीण भालेराव, संजय नेवाळे, वसंत बोराटे, तानाजी खडे, संजय वाबळे, समीर मासुळकर, निवृत्ती शिंदे, शशिकिरण गवळी, सागर बोराटे, घनश्याम खेडकर, युवराज पवार, विशाल आहेर, शरद भालेकर, नंदुतात्या शिंदे 18 समर्थक माजी नगरसेवक आणि  पदाधिकाऱ्यांसह शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. या वेळी माझी महापौर आझम पानसरे, शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते. 
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाची कामगिरी निराशाजनक पाहता आपल्या राजकीय भवितव्यासाठी नगरसेवक, पधाधिकाऱ्यानी अजित पवारांचा साथ सोडून  शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला.

अजित गव्हाणे यांना भोसरीतून विधानसभा निवडणूक लढवायची असून भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार आहे आणि ज्या पक्षाचा आमदार असेल तो त्या मतदार संघाला सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरवल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भोसरी मतदार संघातून महेश लांडगे याना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट आहे. या मुळे अजित गव्हाणे यांनी काल शहराध्यक्ष पदावरून राजीनामा दिला आहे. 
 
Edited by - Priya Dixit