शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जुलै 2024 (21:26 IST)

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी आज शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

ajit panwar
पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित पवार गटाचे अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राजीनामा दिला. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे राजीनामा पत्रात म्हटले आहे. 

भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केलेल्या गव्हाणे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांची काही नगरसेवकांसह भेट घेतली होती. या भेटी नंतर गव्हाणे अजित पवार गट सोडण्याची चर्चा होत होती. आता त्यांनी शहराध्यक्ष पदावरून राजीनामा दिला.

त्यांच्या सोबत शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, आणि भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर यांनी देखील आपापला राजीनामा दिला आहे. आता गव्हाणे शरद पवार गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit