1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified रविवार, 20 जून 2021 (11:43 IST)

अजित पवारांनी 'या' कारणासाठी व्यक्त केली दिलगिरी

पुण्यात शनिवारी (19 जून) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन होत असताना त्याठिकाणी मोठी गर्दी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला पण निर्बंध लागू असताना प्रचंड गर्दी जमल्याने अजित पवार यांच्यावर टीका करण्यात आली.
 
पुण्यात विकेंडला लॉकडॉऊन असूनही मोठया संख्येने कार्यकर्ते कसे जमले? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. गर्दीत लोक कुठेही सुरक्षित अंतर पाळत असताना दिसले नाही. याप्रकरणी अजित पवार यांनी आता दिलगिरी व्यक्त केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "मला कल्पना नव्हती एवढे लोक येतील. मी कार्यक्रम साधेपणाने करायला सांगितला होता. मी येणार नाही असं कळवलं होतं पण कार्यकर्ते नाराज होतील म्हणून मी आलो. मला अशा कार्यक्रमासाठी बोलवलं जातं, जिथे धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. मी पुणेकरांची दिलगिरी व्यक्त करतो."याप्रकरणी अॅक्शन घेण्याची सूचना केली आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.