दुहेरी हत्याकांड, आईचा मृतदेह सासवडला तर मुलाचा मृतदेह कात्रजच्या घाटात आणि वडीलही बेपत्ता

murder pune
Last Modified गुरूवार, 17 जून 2021 (09:45 IST)
पुण्यात खुनाचा एका धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सासवड गावाजवळ आईचा, कात्रज येथील नवीन बोगद्याजवळ आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. तर या मुलाचे वडील बेपत्ता आहेत. सापडलेल्या दोन्ही मृतदेहाच्या अंगावर जखमा आढळल्यामुळे खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले असावेत. पोलीस या गुन्ह्याचा शोध घेत आहेत.
मयत महिलेचे नाव आलिया आबिदा शेख आणि मुलाचे नाव आयान शेख असे आहे. महिलेच्या खुनप्रकरणी सासवड पोलिसांनी अज्ञातावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर भारती विद्यापीठ पोलीस गुन्हा दाखल करण्याचे काम करत आहेत. पोलिसांनी या गुन्ह्याच्या शोध सुरू केला असता या महिलेची चारचाकी गाडी पुणे-सातारा रस्त्यावरील एका चित्रपटगृहासमोर आढळली आहे. त्यामुळेे या खून प्रकरणात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत व्यक्ती हे पुण्यातील धानोरी परिसरातील रहिवाशी आहेत. सकाळच्या सुमारास सासवड जवळील खळद गावाजवळ यातील महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सासवड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत हा खुनाचा प्रकार असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपासाला सुरुवात केली होती. मयत महिलेची ओळख पटविण्यासाठी तिचे फोटो पुणे शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात पाठवले होते.
दरम्यान
कात्रज बोगद्याजवळ आठ वर्षीय मुलाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी करण्यास सुरवात केली असता महिला आणि हा मुलगा माय-लेक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची नावे निष्पन्न झाल्यानंतर हे दोघे धानोरी भागातील असल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक तपासात दोघेही दोन ते तीन दिवसांपूर्वी पिकनिक साठी म्हणून घराबाहेर पडले असल्याचे समोर आले आहे. तर सातारा रस्त्यावरील एका चित्रपट गृहा जवळ त्यांची कार सापडल्यामुळे या प्रकारात आणखी एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्या दोघांचाही खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आला असावा असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

IND vs PAK : बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियांदाद यांच्या ...

IND vs PAK : बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियांदाद यांच्या भेटीत काय घडलं होतं?
भारत-पाकिस्तान यांच्यातील दुरावलेल्या संबंधांमुळे शिवसेनेने नेहमीच पाकिस्तानच्या भारत ...

पाकिस्तान विरुद्धची मॅच आणि कर्णधारपदाबाबत काय म्हणाला ...

पाकिस्तान विरुद्धची मॅच आणि कर्णधारपदाबाबत काय म्हणाला विराट?
भारत पाकिस्तान दरम्यान होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात मैदानावर भारतीय संघ चांगली ...

चार मुलांना विष देऊन माजी सैनिकाची आत्महत्या

चार मुलांना विष देऊन माजी सैनिकाची आत्महत्या
एका माजी सैनिक पित्याने चार मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली ...

...म्हणून सरकारला पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स हटवणं अशक्य - ...

...म्हणून सरकारला पेट्रोल-डिझेलवरचा टॅक्स हटवणं अशक्य - बाबा रामदेव
पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पण योगगुरू बाबा रामदेव यांनी या मुद्द्यावरून केंद्र ...

'म्हणूनच तुम्हाला मास्क घालायला सांगितलं होतं'

'म्हणूनच तुम्हाला मास्क घालायला सांगितलं होतं'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती ...